Sanjay Shirsat-Ambadas Danve Sarkarnama
विदर्भ

Winter Session 2023 : ‘ओ..ऽ लंडन रिटर्न दानवे,’ म्हणत संजय शिरसाटांनी काढला चिमटा

Nagpur Assembly Session : नागपूरच्या विधिमंडळ परिसरात अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांच्यात हास्यविनोद रंगला

Jagdish Pansare

Nagpur News : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचे वातावरण पहिल्या दिवशीच्या आरोप- प्रत्यारोप आणि एकमेकांवरील टीकेने तापले आहे. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात सभागृहात तसेच सभागृहाबाहेरही छोट्या-मोठ्या चकमकी घडत आहेत. (Humorous interaction between Ambadas Danve and Sanjay Shirsat in the legislative area of ​​Nagpur)

त्यातच आज सत्ताधारी पक्षाने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याचे जाहीर केले. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातील वातावरण अधिकच तापले, पण अशा या तापलेल्या वातावरणातही एकमेकांचे विरोधक असलेल्या आमदार, मंत्र्यांमध्ये हास्यविनोद, टोलेबाजी आणि चिमटे काढण्याची स्पर्धाच लागली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर विधिमंडळाच्या परिसरात ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आमदार सचिन अहिर यांच्यासोबत बाहेर पडत होते. मुख्य प्रवेशद्वारावर शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट हे उभे होते.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर, अंबादास दानवे आणि सचिन अहिर समोरून येत असताना शिरसाट आणि दानवे यांनी एकमेकांना पाहत कोपऱ्यापासून हात जोडले. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरात शिरसाट-दानवे यांच्यातील टीका नवी नाही. दोघेही आपापल्या पक्षाची आणि नेत्यांची बाजू मांडताना एकमेकांची उणीदुणी काढतात.

अंबादास दानवे नुकतेच आमदारांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यावरून परतले. त्याचाच संदर्भ देत शिरसाट यांनी ‘ओ..ऽ लंडन रिटर्न दानवे’ अशी हाक मारत त्यांना चिमटा काढला. यावर शांत बसतील ते दानवे कसले? शिरसाट यांनी बेरोजगारीवर भाष्य करताना केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत ‘बेरोजगारांसाठी सोन्याचा धूर काढणारे संजय शिरसाट’ असा पलटवार दानवे यांनी केला. या दोघांमधील जुगलबंदीवर सचिन अहिर आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर मिश्किल हास्य करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT