Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : ''आम्हाला तिघांनाही विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव'' ; अजित पवारांचं विधान!

Assembly Winter Session : ''पुढच्यावेळी विरोधकांना सुपारी द्याचाच कार्यक्रम ठेवायचा.'' असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Winter Session Nagpur : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून नागपूरात सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस बुधवारी महायुती सरकारने पत्रकारपरिषद घेत, आपली भूमिका जाहीर केली. याशिवाय सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. यावरून पत्रकारपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावाला.

अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, ''विरोधी पक्षनेत्यांनी दिलेलं पत्र मी देखील वाचलं आहे. काही काळासाठी मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो. देवेंद्र फडणवीसही विरोधी पक्षनेते होते आणि काही दिवसांसाठी एकनाथ शिंदेही विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे आम्हाला तिघांनाही कमीअधिक प्रमाणात विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर ''चहापान हे निमित्त असंत,त्या निमित्ताने सत्ताधीर पक्ष आणि विरोधी पक्षाने चर्चा करून, कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे. कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तिथं जास्त चर्चा घडवून आणली पाहिजे, याची चर्चा होत असते. त्यासाठी चहापानाचा कार्यक्रम असतो. परंतु त्यांनी बहिष्कार टाकला आहे.'' असं अजित पवारांनी सांगितलं.

तसेच, ''वास्तविक चहापानाच्या कार्यक्रमाच्या ऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे, की पुढच्यावेळी यांना सुपारी द्याचाच कार्यक्रम ठेवायचा. चहापाना ऐवजी पानसुपारीचा कार्यक्रम ठेवायचा.'' अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांनी घेतलेल्या चहापानावरील बहिष्काराच्या निर्णयावर टोला लगावला आहे.

याशिवाय, ''मला त्यांचं काही समजत नाही, विरोधी पक्षनेत्याने दिलेल्या पत्रात २३ जणांचा नावं आहेत. मात्र यावर केवळ सात जणांच्याच स्वाक्षऱ्या आहेत. मग नावं तरी सात जणांची टाकायची होती. नाव टाकतात, ते लोक हजर नसतात. एवढं गांभार्य विरोधी पक्षाच्या सदस्यांना आहे.'' असं म्हणत अजित पवारांनी यावेळई विरोधकांवर निशाणा साधला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT