Assembly Winter Session: 'पुढच्या वर्षी विरोधकांसाठी चहापान नाही तर...'; फडणवीसांनी अधिवेशनापूर्वीच विरोधकांना ललकारलं

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच विरोधकांच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्याच्या निवडणुकीत झोपले, असा टोला फडणवीसांनी लगावला.

"विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, यासाठी हे अधिवेशन असतं. मात्र, विरोधी पक्षांच्या पत्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात पत्रात सधा शब्द नाही, त्यांना त्याचा विसर पडला आहे", असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला. "विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला. पण हा चहापानचा कार्यक्रम चर्चेसाठी असतो. मात्र, पुढच्या वर्षी विरोधकांसाठी सुपारी पान ठेवावे लागेल", अशी खोचक टीका करत त्यांनी विरोधकांना फटकारलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Nawab Malik : जामिनावर बाहेर आल्यानंतर मलिक पहिल्यांदाच अधिवेशनाला; पण बसणार कोणत्या बाकावर?

"राज्यात काय सुरू आहे, याचं विरोधकांना भान नाही. विरोधकांनी लिहिलेल्या पत्रात कंत्राटी भरतीचा उल्लेख करण्यात आला. पण उद्धव ठाकरेंच्या सहीने निघालेला कंत्राटी भरतीचा जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक महिन्यापूर्वीच रद्द केला", असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधी पक्षाला दिले.

"आजही देशाच्या सर्व राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्थिर आहे. विरोधीपक्ष नेत्यांनी एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचायला हवा हे शिकलं पाहिजे. बॅनर लागलेले आम्ही पाहिले 10 दिवस अधिवेशन. पण ज्यांनी त्याच्या कार्यकाळात अधिवेशनच झालं नाही ते सांगतात. आमचा आग्रह राहायचा की अधिवेशन नागपूरला घ्या, पण अधिवेशन म्हटंलं की नकोसं वाटायचं. विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी एकदा आरशात पाहावं", असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.

(Edited by- Ganesh Thombare)

Devendra Fadnavis
Thackeray Group vs Shinde Gat : EVM वादावरून दोन संजय भिडले; गायकवाडांनी राऊतांची अक्कलच काढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com