Yashomati Thakur and Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Yashomati Thakur News : ‘ही’ अमरावतीची संस्कृती नाही, असे म्हणत यशोमतींकडून ठाकरेंचे स्वागत !

सरकारनामा ब्यूरो

Yashomati Thakur on Uddhav Thackeray : दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यात उद्धव ठाकरे काल (ता. नऊ) रात्री पश्‍चिम विदर्भातील अमरावतीमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स फाडले. (Yashomati Thakur said We elected MP Rana)

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. तो राग मनात धरून राणांनी काल पुन्हा हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान आज सकाळी राज्याच्या माजी मंत्री आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांचे अमरावतीमध्ये स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी होते. त्यांनी राणा दाम्पत्याची निंदा केली. खासदार राणा यांना आम्ही निवडून दिले. त्या कुणाला बेडूक म्हणतात, कधीही काहीही बोलतात, त्यांच्याकडून असं कधीही अपेक्षित नव्हतं, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

अमरावतीत काल राणांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेले बॅनर्स फाडले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची अमरावतीची संस्कृती आहे. अशा पद्धतीने वागणे, ही आमची संस्कृती नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जमिनीवर पाय असणारे अतिशय सालस नेते आहेत. नेहमी खरं बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यावर येवढा मोठा आघात झाल्यावरही ते खंबीरपणे उभे आहेत. राज्यभर (Maharashtra) फिरून खरं सांगण्यासाठी ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत. त्यांचा पक्ष चोरल्यानंतर ते पक्ष बांधणीसाठी ताकदीने कामाला लागले आहेत. त्यावेळी असे प्रकार केले जातीलच पण उद्धव ठाकरे सर्वांना पुरून उरतील. अशा घटनांमधून महाविकास आघाडी अधिक घट्ट होणार असल्याचेही यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT