Congress Leader Attacks Sarkarnama
विदर्भ

Congress Leader Attacks : काँग्रेस हादरलं! नेत्याच्या पोटावर, छातीवर अन् खांद्यावर चाकूनं सपासप वार; मदतीसाठी याचना पण...

Yavatmal Congress Leader Attack : यवतमाळमध्ये काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांवर भर चौकात चाकूनं हल्ला करण्यात आला. ते मदतीसाठी याचना करत होते. मात्र, नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. पण...

Akshay Sabale

Congress News: यवतमाळमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील दत्त चौक येथे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर चारजणांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तालुकाध्यक्ष गंभीर जखमी झाले आहेत. तालुकाध्यक्षांवर हल्ला होत असताना नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, रिक्षा चालकाने तालुकाध्यक्षांना मदतीचा हात देऊन रूग्णालयात दाखल केलं.

रमेश भिसनकर, असं हल्ला झालेल्या काँग्रेस तालुकाध्यक्षांचं नाव आहे. भिनसकर यांच्यावर गुरूवारी चार जणांनी घेरून हल्ला केला. त्यांच्यावर चाकूने पोटावर, छातीवर आणि खांद्यावर वार करण्यात आले.

यावेळी तिथे नागरिक मोठ्या संख्येने असूनही हा प्रकार बघत राहिले होते. झटापटीत भिनसरकर यांनी हल्लेखोराकडून चाकू हिसकवल्यानंतर ते मागे सरकले. याच संधीचा फायदा घेऊन रिक्षा चालकाने धाडस करून भिनसकर यांना रिक्षात बसवून रूग्णालयात दाखल केलं.

भिनसकर हे रक्ताच्या थारोळ्यात असताना मदतीसाठी याचना करत होते. मात्र, गर्दीतून एकानेही पुढे येण्याचं धाडस केलं नाही. शेवटी रिक्षा चालकाने भिनसकर यांना मदतीचा हात देऊन रूग्णालयात दाखल केलं. भिनसकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.

असा घडला थरारक घटनाक्रम...

गुरूवारी दुपारच्या सुमारास भिनसकर हे दत्त चौकातील हॉटेल रामायण येथे आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी भिनसकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. आरडाओरड ऐकल्यानंतर नागरिकांनी एकच घोळका करून गर्दी केली.

हल्लेखोर आणि भिनसकर यांच्यात झटापट झाली. तेव्हा, हल्लेखोराच्या हातातील चाकू भिनसकर यांनी हिसकावला. त्यावेळी हल्लेखोर मागे सरकले. तेवढ्यात भिनसकर यांच्या ओळखीच्या रिक्षाचालकाने रक्ताच्या थारोळ्यात त्यांना रूग्णालयात दाखल केलं. रूग्णालयात दाखल करत असताना रिक्षाचा हल्लेखोरांनी पाठलाग केला होता.

हल्लेखोरांना अटक....

भिनसकर यांच्यावर हल्ल्यानंतर पोलिस यंत्रणा सक्रिय झाले. या हल्ल्यातील आरोपी वामन राठोड ( रा. बेचखेडा ) आणि देवेंद्र बाबुसिंग आडे ( रा. भांबराजा ) यांना शहरातील राणा प्रतापनगर येथून अटक केली आहे. या घटनेचा तपास अवधूतवाडी पोलिस करत आहेत.

राजकीय सुडातून हल्ला...

यवतमाळ तालुक्यातील राजकारणात रमेश भिनसकर यांचं वजन आहे. भिनसकर हे बेचखेडा ग्रामपंचायतील सरपंच राहिले आहेत. त्यासह ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता आहे. सहकार क्षेत्रातही भिनसकर यांचं काम आहे. राजकीय सुडातून भिनसकर यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा आहे. मात्र, घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT