Anil Deshmukh : अनिल देशमुख संतापले, कामगार विभागाला न्यायालयात खेचणार?

Anil Deshmukh Furious Plans to Drag Labor Department to Court: अनिल देशमुख म्हणाले, भाजप तसेच महायुतीचे आमदार असलेल्या मतदारसंघात तातडीने साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh
Devendra Fadnavis Vs Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Anil Deshmukh News: छोट्या छोट्या बाबतीतही महायुती सरकार राजकारण आणि भेदभाव करीत आहे. फक्त सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघातच साहित्य वाटप केले जात आहे. हे असेच सुरू राहिलेत तर कामगार विभागाला न्यायालयात खेचू, असा इशारा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात असंघटित व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात असे कार्यक्रम होत नसल्याने देशमुख यांनी संताप व्यक्त केला.

अनिल देशमुख म्हणाले, आपल्या काटोल-नरखेड मतदारसंघातही शेकडो कामगारांनी नोंदणी केली आहे. त्यांना साहित्य वाटप करावे यासाठी दोन महिन्यांपासून कामगार विभागाने कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी केली होती.

मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजप तसेच महायुतीचे आमदार असलेल्या मतदारसंघात तातडीने साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh
Marathwada Political News : अमित शहा येऊन गेल्यानंतर संभाजीनगरात तिसरी आघाडी सक्रीय

ही योजना शासनाची आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने या योजनेचा लाभ सर्वच लोकप्रतिनिधींना देणे अपेक्षित आहे. मात्र भाजप व महायुती सरकारचे नेते यातही राजकारण करीत आहे, असा आरोप देखील देशमुख यांनी केला.

महायुतीचेच नेते सर्व करतात असे दर्शवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे विरोधक निष्क्रिय आहेत असे असेही अंकित करून मतदारांची दिशाभूल करण्याच प्रयत्न केला जात आहे. आपल्या मतदारसंघातील नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटप केले नाही तर आपण न्यायालयात दाद मागू, असाही इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh
Video Hasan Mushrif : 'मुश्रीफांनी पालकमंत्री पदासाठी केली नात्यांची डील'; समरजीत घाटगेंचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com