Yavatmal DCC Bank .jpg Sarkarnama
विदर्भ

Yavatmal Dcc Bank: जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी 'मित्रपक्ष' विरोधकांना ताकद पुरवणार? 'महाआघाडीची' चाचपणी

Yavatmal Dcc Bank Election 2026: जिल्हा बँकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः भाजपविरोधात काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याच्या हालचाली प्राथमिक स्तरावर सुरू झाली आहे.

चेतन देशमुख

Yavatmal News : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. बुधवारी (ता.१९) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. आता ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, ऑक्टोबरमध्ये मतदान होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणाने पुन्हा एकदा उकळी घेतली आहे.

यवतमाळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः भाजपविरोधात काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याच्या हालचाली प्राथमिक स्तरावर सुरू झाली आहे. सर्वपक्षीयांची मोट बांधून भाजपला रोखण्याची रणनीती आखली जात असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत.

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. कोणत्या मतदारसंघात कोणाचे वर्चस्व आहे, कोणाची राजकीय ताकद वाढली आहे आणि कुठे समीकरणे बदलली आहेत, याचा अंदाज या यादीतून नेते घेत आहे.

जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचा महत्वाचा केंद्रबिंदू मानली जाते. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांनी आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्यानंतर आघाडीच्या चर्चांना अधिकृत स्वरूप येण्याची शक्यता आहे.

ऑगस्टच्या अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास सप्टेंबरमध्ये उमेदवारी अर्ज, छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

भाजपविरोधात एकजुटीची तयारी ?

गेल्या निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यावेळीही भाजपची भूमिका स्वतंत्र राहणार की नव्या राजकीय समीकरणांनुसार वेगळी रणनीती आखली जाणार, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये एकत्रित आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT