UP Court verdict: 'यूपी'च्या राजकारणात उडाली खळबळ, माजी आमदारासह 11 जणांना जन्मठेप; वकील अन् शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या प्रकरण

Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात 15 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध वकील मंजुल चौबे आणि त्यांची चुलत बहीण (सरकारी शिक्षिका) सुधा चौबे यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Samajwadi Party Former MLA Kamlesh Pathak   .jpg
Samajwadi Party Former MLA Kamlesh Pathak .jpgSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात 15 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध वकील मंजुल चौबे आणि त्यांची चुलत बहीण (सरकारी शिक्षिका) सुधा चौबे यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या बहुचर्चित प्रकरणात ६ वर्षानंतर, विशेष एमपी-एमएलए न्यायालयानं मोठा निकाल दिला आहे.

कोर्टानं आता समाजवादी पार्टीचे माजी आमदार कमलेश पाठक, त्यांचे दोन भाऊ आणि इतर एकूणम 11 दोषींना जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील नारायणपूर येथील येथे पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात 15 मार्च 2020 वकील मंजुल चौबे आणि शिक्षिका सुधा चौबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

भरदिवसा करण्यात आलेल्या या हत्येपाठीमागचं कारणही पोलिसांच्या तपासा दरम्यान समोर आलं होतं. त्यात पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील एका बिघा जमिनीवरून दोन्ही पक्षांत जुना वाद व ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरूअसल्याचं पोलिसांच्या तपासादरम्यान निदर्शनास आलं होतं.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या आणि सर्वाधिक काळ चाललेल्या या प्रकरणात विशेष खासदार-आमदार न्यायालयाने या दुहेरी हत्याकांड प्रकरणात समाजवादी पार्टीचे माजी आमदार कमलेश पाठक आणि त्यांचे भाऊ संतोष पाठक यांच्यासह 10 जणांना दोषी ठरवले आहे.

Samajwadi Party Former MLA Kamlesh Pathak   .jpg
Gokul News: 'गोकुळ'मधील अवसायानातील संस्थांना मतदानाचा अधिकारच नाही? न्यायालयाच्या निकालातील धक्कादायक मुद्दा आला समोर

या हत्येप्रकरणातील या आरोपींपैकी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा खटला दीर्घकाळ चालला. आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्याचा खटला बाल न्याय मंडळासमोर प्रलंबित आहे. या शिक्षेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com