Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा; म्हणाले, 'पर्वा नाही!'

FIR Against Bachchu Kadu in Yavatmal for Unauthorized Public Meeting : माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह आयोजकांवर महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Pradeep Pendhare

Yavatmal political : शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात यवतमाळच्या महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बच्चू कडू सातबारा कोरा यात्रा काढली होती. या यात्रेचा समारोप यवतमाळ इथं झाली. यानिमित्ताने सभा झाली. या सभेचं स्थळ अचानक बदलल्यानं बच्चू कडू यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सातबारा कोरा यात्रेची समारोप सभा नियोजित ठिकाणी न घेता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घेण्यात आली. विना परवानगी महामार्गावर सभा घेतल्याने माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासह आयोजकांवर महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा समारोप अंबोडा इथं गजानन महाराज मंदिरात होणार होता.

यावेळी सभेला पाच ते सात हजार शेतकऱ्यांचा (Farmers) जनसमुदाय होता. शिवाय 30 ते 40 ट्रॅक्टर होते. खडका ते अंबोडा पर्यंत दोन्ही बाजूनी मोर्चा चालत होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ऐनवेळी सभेचे ठिकाण आयोजकांनी बच्चू कडू यांनी बदलले. राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली.

यामुळे आयोजकांनी बेकायदेशीर जमाव जमवून नियोजित ठिकाणी सभा न घेता राष्ट्रीय महामार्गावर सभा घेतल्याप्रकरणी बच्चू कडूसह गणेश ठाकरे, आकाश पावडे, रामेश्वर कदम, सचिन राऊत, बंडू वाघमारे, सुनील पावडे, सदानंद राऊत, पप्पू करपे, शेख रियाज, योगेश तायडे, शुभम खेडे (सर्व रा. अंबोडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यालाच संविधान म्हणायचे का?

'आमच्या सभेने रस्ता ब्लॉक झाला. पण त्याच दिवशी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सभा व्यवस्थित झाली पाहिजे, यासाठी चार ते पाच रस्ते पोलिसांनी ब्लॉक केले. सरकारला हे चालते. राज्यपाल, मुख्यमंत्र्यासाठी वेगळे कायदे आणि सामान्य नागरिक शेतकरी गर्दी करतात, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करता, यालाच संविधान म्हणायचे का? आमच्यावर गुन्हे दाखल झाले, याची आम्हाला पर्वा नाही', असे माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT