
Ahilyanagar municipal scam : अहिल्यानगरमधील शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील 500 कोटी रुपयांचा घोटाळ्याचं प्रकरण गाजत असताना, अन् त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे संकेत दिले असतानाच, आणखी एक घोटाळा समोर आला आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या रस्त्यांच्या कामात 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात चौकशीसाठी पत्र देत खासदार राऊत यांनी कारवाईची मागणी केली आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या कोट्यवधींच्या घोटाळ्यासंदर्भात पत्र लिहिताना, अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, "महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची व आमदारांच्या राडेबाजीची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात राज्यात एक प्रकारची अनागोंदी माजली असून महापालिकांतील प्रशासक व अधिकारी संगनमताने सरकारी तिजोरीची लूट करीत आहेत. अहिल्यानगर महापालिकेतले प्रकरण धक्कादायक आहे".
शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कोट्यवधींच्या घोटाळ्यासंदर्भात पत्र लिहिताना, अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, "महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची व आमदारांच्या राडेबाजीची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात राज्यात एक प्रकारची अनागोंदी माजली असून महापालिकांतील प्रशासक व अधिकारी संगनमताने सरकारी तिजोरीची लूट करीत आहेत. अहिल्यानगर महापालिकेतले प्रकरण धक्कादायक आहे".
अहिल्यानगर महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी, ठेकेदारांच्या गँग यांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या आमदार असणाऱ्या संग्राम जगताप यांच्या वरदहस्ताने संगनमत करत कटकारस्थान रचून अहिल्यानगर शहरातील सन 2016 ते 2020या चार वर्षाच्या कालावधीत 776 रस्त्यांच्या सुमारे रुपये 350 ते 400 कोटींहून अधिक रकमेचा महाघोटाळा करत भ्रष्टाचार केला आहे. हा अहिल्यानगरमधील आजवरचा सर्वात मोठा स्कॅम असून संबंधित लोक सरकारला समर्थन देत असल्याने हा स्कॅम दडपला जात आहे.
हा घोटाळा अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी उघड केला आहे. महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत असताना 8 मे 2023 रोजी त्यांनी पहिली तक्रार अहिल्यानगर महापालिका आयुक्तांसह जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच आपल्याच सरकारमधील महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती, याकडे खासदार राऊत यांनी लक्ष वेधले.
यानंतर त्यांनी आजवर नगर विकास विभाग, गृह विभाग तसेच या मनपाला कामांची बिले अदा करण्यापूर्वी आवश्यक असणारे, दिले जाणारे गुणवत्तांचे प्रमाणपत्र, ज्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत असणाच्या अहिल्यानगरमधील शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेच्यावतीने दिले जाते, त्यांच्याकडे वारंवार लेखी पाठपुरावा केला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
किरण काळे यांनी केलेल्या तक्रारीकडे लक्ष वेधताना, त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर अहिल्यानगरमधील शासकीय तंत्रनिकेतनने 16 जुलै 2023 यांनी पाच सदस्य समिती गठीत केली. या समितीने सर्व उपलब्ध कागदपत्र, पुरावे यांची सखोल पडताळणीत सुमारे 776 रस्त्यांच्या कामांची शेकडो कोटींची बिले लाटण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मनपा सार्वजनिक बंधकाम विभागाचे शहर अभियंता, इतर अभियंते, या विभागातील कर्मचारी, आपल्या महायुतीच्या आमदारांचे कार्यकर्ते असणारे शेकडो ठेकेदार यांनी राजकीय वरदहस्तातून संगनमत करून कटकारस्थान करून शासकीय तंत्रनिकेतनने काही भ्रष्ट लोकांना हाताशी धरून सरकारी संस्था असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, राजपत्रित असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावांचे बनावट शिक्के, त्यांचा खोट्या सह्या करून हा महाघोटाळा केल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.
या घोटाळ्यामध्ये महायुतीच्या विद्यमान आमदारांसह आज आपल्याला समर्थन देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात असणाऱ्या तत्कालीन महापौर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने महापौर, असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. या महाघोटाळ्याचा मलिदा भ्रष्ट नेते, अधिकारी यांनी संगनमत करत लाटला आहे.
अहिल्यानगरच्या जनतेच्या व्यापक हितासाठी आपण या भ्रष्टाचाराची दखल घेत तत्काळ सर्व दोषींवर उपलब्ध चौकशी अहवालाच्या आधारे गंभीर स्वरूपाचे फौजदारी खटले दाखल करावे. दोषींना तत्काळ अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे खासदार राऊत यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.