Sanjay Rathod, Madan Yerawar and Raju Umbarkar. Sarkarnama
विदर्भ

Yavatmal Politics News : दहीहंडीच्या माध्यमातून निवडणुकांची तयारी, सेलिब्रिटींची हजेरी !

Wani - Yavatmal : प्राजक्ता माळी सोमवारी वणी येथे असणार आहेत.

Atul Mehere

Yavatmal District Political News : आगामी २०२४ या वर्षात लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आत्तापासून नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात यंदा दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील उमरखेड, दिग्रस, वणी आणि यवतमाळ येथे दहीहंडीसाठी सेलिब्रिटींची हजेरी असणार आहे. (Prajakta Mali will be at Wani on Monday)

आगामी काळात लोकसभा, विधानसभा तसेच नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. या निवडणुकींसाठी आत्तापासून राजकीय नेते कामाला लागले आहेत. यंदा श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी शक्तिप्रदर्शनाचे नियोजन केले आहे. १० सप्टेंबरला उमरखेड येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपचे (BJP) लोकसभा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा मित्र परिवारातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे असणार आहेत. या कार्यक्रमाला सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू उपस्थित राहणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bawankule) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, (Sudhir Mungantiwar) भाजप नेते मदन येरावार, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह महायुतीतील जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

भाजप नेते आमदार मदन येरावार यांच्या पुढाकाराने यवतमाळ येथील पोस्टल मैदानावर १२ सप्टेंबर रोजी दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दहीहंडीसाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार आहे. शक्ती लाइट्स दहीहंडीचे मोठे आकर्षण राहणार आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी वणी येथील शासकीय मैदानात ११ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.

उंबरकर यांनीही सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांना निमंत्रित केले आहे. प्राजक्ता माळी सोमवारी वणी येथे असणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शुक्रवारी (ता. आठ) दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात लावणी कलावंत माधुरी पवार यांनी उपस्थिती लावली. जिल्ह्यातही आता दहीहंडी महोत्सव सुरू झाला असून, त्या माध्यमातून राजकीय नेत्यांकडून शक्तिप्रदर्शनही केले जात आहे.

युवा मतदारांवर डोळा...

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि युवा यांचा अगदी जवळचा संबंध आहे. नव्या मतदार नोंदणीत युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आगामी निवडणुका पाहता युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. त्यासाठी यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT