Yavatmal:राज्यात एक शिक्षकी शाळांची संख्या वाढत असल्याचे वास्तव आहे. अशातच एकशिक्षकी शाळेतील शिक्षकाने दांडी मारल्याने सरपंचांनी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. यवतमाळच्या मारेगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या कानडा या आदिवासी बहुल जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला. मनसेच्या महिला सरपंचांनी शाळा भरवली आणि प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घातले.
कानडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण नऊ विद्यार्थी आहेत. त्यांना शिकवायला एक पूर्ण पगारी शिक्षक, तर एक कंत्राटी शिक्षक आहे. मात्र, या दोन्ही शिक्षकांनी शाळेला एकाच दिवशी दांडी मारली. त्यामुळे मुलांना कोण शिकवणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी गावच्या सरपंच सुषमा ढोके यांनी पुढाकार घेतला. त्यांनी शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शिकवले. मारेगाव तालुक्यातील कानडी-पार्डी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा ढोके यांनी स्वतःच विद्यार्थ्यांचा क्लास घेतला अन् शिक्षण विभागाला कारच्या तोंडावर अनोखी चपराक दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कानडा आणि पार्डी ही ग्रुप ग्रामपंचायत असून, सातशे लोकसंख्येचे गाव आहे. ज्यांची आर्थिक स्थिती समृद्ध आहे ते सर्व आपल्या पाल्यास खासगी शाळेत शिक्षणासाठी पाठवितात, पण गरिबांची नऊ चिमुरडी मुले मात्र सरकारी शाळेत शिकत आहेत, अशा वेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सुषमा ढोके यांनी गौरवास्पद कामगिरी केली. त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने येत्या काळात राज्यात एकशिक्षकी शाळा बंद होण्याचे संकट ओढावण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एकशिक्षकी शाळांची संख्या वाढत असून, यामध्ये सर्वाधिक सरकारी शाळा या मुंबई शहरात आहेत; तर उपनगरात मात्र अनुदानित शाळांची संख्या अधिक आहेत. ज्या शाळा एक शिक्षकी झाल्या, त्यामध्ये सर्वाधिक मराठी माध्यमाच्या शाळा आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.