Jitendra Awhad: विरोधक आमदारांचे तालुके वगळले; दुष्काळावरून आव्हाड संतप्त...

Maharashtra Politics : दुष्काळी तालुका जाहीर करताना राजकारण करीत विरोधी पक्षाच्या आमदारांचे तालुके वगळले आहेत, असा आरोप आव्हाडांनी केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai: शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे, काही तालुक्यांत पाऊस कमी झाल्यानंतरही या तालुक्यांना वगळण्यात आले असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना दुष्काळी तालुका जाहीर करताना राजकारण करीत विरोधी पक्षाच्या आमदारांचे तालुके वगळले आहे, असा आरोप आव्हाडांनी केला आहे.

"परतीच्या पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी उभी पिकं करपून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागली, भात, कुळीथ, खुरासणी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुष्काळी तालुके जाहीर करताना त्यामध्येदेखील राजकारण करण्यात आलं," असे आव्हाडांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सत्ताधारी पक्षाच्या जवळ असलेले आमदारांचे काही तालुके जाहीर करण्यात आले. विरोधी पक्षाच्या आमदारांचे तालुके निवडून-निवडून बाजूला करण्यात आले. आमदार कोणाचाही असो पण, मतदार तर महाराष्ट्राचा आहे. तो माणूस तर मराठी आहे. आता राजकारणापोटी मराठी माणसाचा जीव घेणार का ? राजकारण कशात करावं, हादेखील बौद्धिक आकलनाचा भाग असतो," असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.

Maharashtra Politics
Bachchu Kadu: बच्चू कडूंनी भाजपविरोधात थोपटले दंड; आमचं अस्तित्व स्वतंत्र...!

यंदा राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचमुळे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यांतील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

Maharashtra Politics
Sameer Kunawar :भूमापकाचा आत्महत्येचा प्रयत्न; भाजप आमदार समीर कुणावरांवर गुन्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com