Bhavna Gawali News Sarkarnama
विदर्भ

Bhavna Gawali News: भावनाताईंचा विश्वासघात तुम्हाला महागात पडेल; महिला जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

Yavatmal Washim Lok Sabha Constituency 2024: भावना गवळींची उमेदवारी कापल्यानं वैशाली येळणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे उपरोधकपणे अभिनंदन केले आहे. शिवसेना वाचवण्याची त्यांनी विनंती केली आहे.या पत्रावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Mangesh Mahale

Akola: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी कापून त्यांच्या पत्नी राजश्री (Rajshree Patil) यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून (Yavatmal Washim Lok Sabha Constituency 2024) उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांची उमेदवारी कापून राजश्री पाटील यांना देण्यात आली. त्यामुळे तिथेही स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा संघर्ष सुरू आहे.

गवळी समर्थकांनी तर थेट काम न करण्याचा इशाराच दिला आहे. वाशिम महिला शिवसेना जिल्हा प्रमुख वैशाली येळणे यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यांचे पत्र व्हायरल होत आहे. भावनाताईंचा केलेला विश्वासघात तुम्हाला महागात पडेल,असा इशाराच या पत्रात येळणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

भावना गवळींची उमेदवारी कापल्यानं वैशाली येळणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे उपरोधकपणे अभिनंदन केले आहे. शिवसेना वाचवण्याची त्यांनी विनंती केली आहे. सोशल मीडियावर या पत्रावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका महिला खासदाराची उमेदवारी कापल्यानं राज्यातील जनता आपलं अभिनंदन करतेय. भावना गवळी यांनी २५ वर्ष खासदार म्हणून केलेल्या कार्याचं आपण त्यांना चांगलं बक्षीस दिलं. तुमच्या यवतमाळमधील सभेपेक्षाही भावना गवळींच्या घरी जास्त गर्दी होती. भावना गवळी तुमच्याकडे विश्वासाने आल्या होत्या त्यांचं कुठे चुकलं? असा सवाल येळणे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. ताईंचा झालेला विश्वासघात तुम्हाला महागात पडेल,लोक आपल्यावर विश्वास ठेवतील का? यावर शंका वाटते, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात सुनावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT