Jayant Patil  Sarkarnama
विदर्भ

Jayant Patil : ‘तुमची कोणाचीही गरज नाही; एक मुख्यमंत्री काफी है, सांगण्यासाठीच अधिवेशन होतं’; जयंतरावांनी मोका साधलाच

Assembly Winter session : महायुतीला 237 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे चुटकीसरशी हे सरकार स्थापन होईल आणि कारभार सुसाट सुरू होईल, असं वाटत होतं.

Vijaykumar Dudhale

Nagpur, 21 December : मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करेन की, कोणत्याही मंत्र्याला उत्तर देण्याचा त्रास त्यांनी होऊ दिलेला नाही. सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की, तुमच्या कोणाचीही गरज नाही. एक मुख्यमंत्री काफी है. त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सुमारे २३७ आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कोणत्याही मंत्र्यांची गरज नाही, हे सांगण्यासाठी या अधिवेशनाचा वापर झाला आहे, हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढत भाषण केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. ध्यानीमनी नसताना एवढं मोठं यशं मिळालं. जनताही चक्रावून गेली आहे. हे कसं झालं?, हा प्रश्नही राज्यात अनेकजण विचारत आहेत. महायुतीला 237 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे चुटकीसरशी हे सरकार स्थापन होईल आणि कारभार सुसाट सुरू होईल, असं वाटत होतं.

महायुतीचे सरकार (Mahayuti Government) स्थापन करायचं सोडून लोक दिल्लीला जायला लागली. कोणीही समारंभारला समोर येत नव्हतं. थेट स्वतःच्या गावाला निघून गेलं. त्यात सरकारचे बरेच दिवस गेले. थोडसं नाराजीनाट्य चालू होतं. ‘मैं मईके चली जाऊंगी...’ या गाण्याचे बोल ऐकवून सध्या राज्यात अशीच परिस्थिती आहे. पण, दुजा ब्याह रचाऊंगा म्हटल्यावर नाराजीची जुळणी झाली, असा दावाही जयंतरावांनी केला.

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या वाक्याचा आधार घेत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विधानसभेचा निवडणुकीचा 23 नोव्हेंबरला निकाल लागला. त्यानंतर तेरा दिवसांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आज 21 डिसेंबर अशी तारीख आहे. एक महिना होत आला तरी आमच्या गिरीश महाजन यांना माहिती नाही की, आपण कोणत्या खात्याचं मंत्री होऊ शकतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील म्हणाले, एक महिना होत आला. हिवाळी अधिवेशनाचे जवळपास सहा दिवस संपले. पण मंत्रिमहोदयांनो हे माहिती नाही की, आपण कोणत्या खात्याचे उत्तर द्यायचे आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करेन की, कोणालाही उत्तर देण्याचा त्रास त्यांनी होऊ दिलेला नाही. सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की, तुमच्या कोणाचीही गरज नाही. एक मुख्यमंत्री काफी है. त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे.

सुमारे 237 आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कोणत्याही मंत्र्यांची गरज नाही, हे सांगण्यासाठी या अधिवेशनाचा वापर झाला आहे, हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की, तुम्ही नसला तरी सरकारची काही बिघडणार नाही. एकटे देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवू शकतात, हे या अधिवेशनात त्यांनी दाखवून दिलं आहे, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT