Suresh Dhas : कुणाच्या तरी पायातील बूट काढा अन्‌ माझ्या तोंडात हाणा... विधानसभेत सुरेश धस आक्रमक...

Assembly Winter Session : धस यांनी रामापूर तांडा येथील पीकविमा भरणाऱ्यांची वाचून दाखवली. त्यात जयस्वाल हे नाव हेाते. बंजारा समाजात जयस्वाल कोठून आले. दहिफळे हे कधी बंजारा झाले हे कळेना. मी वाचून दाखवलेली आडनावं बंजारामध्ये कधी आली आहेत, असा सवालही त्यांनी केला.
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 21 December : बोगस पीकविमा प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. परभणी जिल्ह्यातील रामापूर तांडा येथील सीएससी केंद्रावरून भरलेल्या तब्बल चार हजार हेक्टर बोगस पीकविम्यावर बोलताना एका तांड्याचा चार हजार हेक्टर एरिया असतो का अध्यक्ष महोदय? मला कुणीतरी सांगा. कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडात हाणा, अशी उद्‌विग्न भावना सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बोगस पीकविमा प्रकरणावर बोलताना व्यक्त केली.

आमदार धस म्हणाले, परभणीतील (Parbhani) रामापूर तांडा येथील सीएससी केंद्रावरून चार हजार हेक्टरचा पीकविमा भरला आहे. बंजारा समाजात चार ते पाचच आडनावं आहेत. पवार, राठोड, चव्हाण, जाटोद, आडे ही पाचच आडनावे आहेत. पण, रामापूर तांडा (ता. पालम, जि. परभणी) येथील सीएससी केंद्रावरून चार हजार हेक्टरचा पीकविमा भरण्यात आलेला आहे. तांड्याचा एरिया चार हजार हेक्टर असतो का हो अध्यक्ष महोदय?

एकनाथ शिंदेंनी संजय राठोडांना, अजितदादांचे प्रतिनिधी इंद्रनील नाईक हे वसंतराव नाईक यांचे नातू म्हणून ते सभागृहात आलेले आहेत. ते पुसदचे प्रतिनिधी आहेत त्यांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात संधी दिली आहे. असे सांगून धस यांनी रामापूर तांडा येथील पीकविमा भरणाऱ्यांची वाचून दाखवली. त्यात जयस्वाल हे नाव हेाते. बंजारा समाजात जयस्वाल कोठून आले, हे मला काही कळेना. दहिफळे हे कधी बंजारा झाले हे कळेना. मी वाचून दाखवलेली आडनावं बंजारामध्ये कधी आली आहेत, असा सवालही त्यांनी केला.

Suresh Dhas
Valmik Karad : वाल्मिक कराडने 32 खून केलेत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप...

रामापूर तांड्याचा २०२४ या वर्षी तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविण्यात आलेला आहे. आमच्या तालुक्यातील लोक दुसऱ्या तालुक्यात कसा काय विमा भरू शकतात. माझं खामगाव चिखलीला नाव आलं तर कसं काय जमलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करावी लागणार आहे, प्रधानमंत्री पीकविमा योजनेत देशातील सातबारावर कुणीही नावं टाकून द्यायची, अशी खिल्लीही या प्रकरणाची त्यांनी उडवली.

धस म्हणाले, रामापूर तांडा या सीएससी केंद्रावरून घोटाळा झाला आहे. आमदार राजेश विटेकर यांच्या परभणी जिल्ह्यातील सोनपेठ या तालुक्यातील रेवा तांडा येथील सीएसी केंद्रावरून एवढा (कागदपत्रांचा मोठा गठ्ठा झळकवत) गठ्ठा आहे, एकाच गावात पीकविमा भरलेला. अरं वावरं तरी आहेत का? जमीन तरी आहे का येथे एवढी?. शक्य आहे का?

Suresh Dhas
Assembly Session : संसदेत अमित शाहांची बॅलेटची मागणी मान्य करता; मग मारकडवाडीत ‘बॅलेट’वर का मतदान घेत नाही?

सखाराम तांडा, भाऊंचा तांडा (ता सोनपेठ, जि. परभणी) ही नावे घेत एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे आलेल्या कागपदत्रांनुसार १३ हजार १९० हेक्टरचा बोगस पीकविमा भरण्यात आलेला आहे. आम्ही भाऊचा धक्का ऐकला होता, तर भाऊंचा तांडा आम्ही पहिल्यांदाच ऐकला आहे. बंजारा समाजाची आडनावे नसूनही भाऊंचा तांडा या सीएसी केंद्रावरून कसा काय पीकविमा भरण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा नवा परळी पॅटर्न आहे, तो सगळीकडे लागू करण्यात यावा, अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहे, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com