Youth Congress Politics Sarkarnama
विदर्भ

Youth Congress Politics : बड्या नेत्यांच्या चिरंजीवांना युवक काँग्रेसचा झटका; पाच डझन पदाधिकारी पदमुक्त

Youth Congress Ajay Chhikara Kumar Rohit action inactive office bearers Nagpur Youth Congress : नागपूर प्रदेश युवक काँग्रेसने निष्क्रियतेचा ठपका ठेवत संघटनेत मोठी कारवाई करण्यास सुरवात केल्याने खळबळ उडाली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठे ऑपरेशन करण्यात आले आहे. तब्बल पाच डझन पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. यात महासचिव केतन ठाकरे, शिवानी वडेट्टीवीर, सइश वारजूकर, अनुराग भोयर यांच्यासह, सचिव, विधानसभा अध्यक्ष तसेच नागपूर जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. या सर्वांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला असून पदमुक्तीचे आदेश धडकताच युवक काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अजय छिकारा आणि सहप्रभारी कुमार रोहित यांनी उपरोक्त आदेश काढले आहेत.

केतन ठाकरे नागपूर (Nagpur) शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांचे, तर अनुराग भोयर हे कामठी विधानसभा मतदरसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणारे सुरेश भोयर यांचे चिरंजीव आहेत. शिवानी वडेट्टीवार या माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.

युवक काँग्रेसच्यावतीने (Congress) दिलेले कामे करीत नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत आणि त्यांच्या पक्षांतर्गंत विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मुद्दामच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते.

या दरम्यान लोकसभेची निवडणूक असल्याने दिलेले कार्य करता आले नाही, असे सांगून अनेकांनी आपली सुटका करून घेतली होती. आता विधानसभेची निवडणूक आटोपताच तब्बल 60 पदाधिकाऱ्यांना थेट पदमुक्त करण्यात आले आहे. यात 9 महासचिव, 44 सचिव यांच्यासह नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष, पूर्व नागपूर विधानसभा अध्यक्ष, सावनेर, कामठी, काटोल, हिंगणा आणि उमरेड विधानसभा अध्यक्षांचा समावेश आहे.

पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपूरचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे, पूर्व नागपूरचे अध्यक्ष भावेश तलमले, सावनेरचे राजेश खंगारे, कामठीचे असलम अली, काटोलचे विनोद नोकरिया, हिंगण्याचे फिरोज शेख, उमरेडचे गुणवंत मंधारे होते. जिल्हाध्यक्ष कन्हेरे यांच्यावर यापूर्वीसुद्धा कारवाई करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT