भंडारा : प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया (Gondia) तालुक्यात भाजपने १३ पैकी ६ जागांवर विजय मिळवीत मुसंडी मारली. भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी ४ जागा चाबी या चिन्हावर निवडून आल्या. हे चारही उमेदवार भाजप समर्थीत आहेत. हे समीकरण धरल्यास १३ पैकी १० जागांवर भाजप, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) केवळ ३ जागा मिळवता आल्या. जेथे प्रफुल्ल पटेलांचे (Prafull Patel) घर आहे, त्या फुलचूरमध्येही पटेलांना पराभवाचे तोंड बघावे लागले.
गोंदिया तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिरसोला, एकोडी, कुडवा, चाबीने पांजरा, नागरा, पिंडकेपार, खमारी, भाजपने धापेवाडा, पांढराबोडी, कामठा, रत्नारा, आसोली, फुलचूर अशा जागांवर विजय मिळविला. यातील अपक्ष चाबी या चिन्हावर निवडून आलेले सर्व उमेदवार भाजपचेच आहेत. गोंदिया तालुक्यातील १३ जागांपैकी भाजपने ६, भाजप समर्थीत अपक्षांनी ४ जागांवर विजय मिळविला, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ ३ जागांपर्यंत मजल मारू शकली.
पटेलांनी खास जागाही गमावल्या..
डव्वा आणि बोंडगाव देवी या दोन प्रफुल्ल पटेलांच्या खास जागा होत्या. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीला पराभव पाहावा लागला. जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्यावर या पराभवाची जबाबदारी निश्चित केली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रतिष्ठेच्या ३ जागा होत्या, देवरी, आमगाव आणि गोरेगाव. देवरीत कुराड जिल्हा परिषद गटातून भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांच्या पत्नी सविता पुराम विजयी झाल्या. गोरेगावला भाजपचे माजी आमदार खोमेश रहांगडाले यांनी मुलगा पंकज याला लॉन्च केले. तो गोरगाव तालुक्यातील सोनी जिल्हा परिषद गटातून निवडून आला. आमगावमध्ये मात्र भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार केशव मानकर यांचा मुलगा हरिहर मानकर यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. जिल्हाध्यक्षांना आपल्या मुलाला वाचवता आले नाही.
राष्ट्रवादीला १२ तर कॉंग्रेसला ४ जागांचा फटका..
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १२ जागा, तर कॉंग्रेसच्या ४ जागा कमी झाल्या आणि भाजपने गतवेळपेक्षा यावेळी ९ जागा वाढवून घेतल्या. कॉंग्रेसच्या तिकिटावर तब्बल ३ वेळा विधानसभेवर आणि २ वेळा विधानपरिषदेवर निवडून आलेले पाच टर्मचे आमदार गोपाल अग्रवाल यांची तेव्हाही गोंदिया तालुक्यावर पकड होती आणि आज ते भाजपमध्ये आल्यानंतर भलेही ते आमदार नाहीत, पण गोंदिया तालुक्यावरची आपली पकड आजही तेवढीच घट्ट आहे, हे त्यांनी या निवडणुकीच्या निकालांतून दाखवून दिले. देवेंद्र फडणवीस गोंदियात प्रचाराला आलेले असताना ‘तुम्ही गद्दाराला (विनोद अग्रवाल यांचे नाव न घेता) जवळ करू नका, मी तुम्हाला गोंदिया तालुक्यात भरघोस यश मिळवून देईन’ असा शब्द फडणविसांनी दिला होता, तो गोपाल अग्रवाल यांनी तंतोतंत पाळला.
माजी मंत्री राजकुमार बडोलेंची पकड कायम..
तिरोड्यात भाजप आमदार विजय रहांगडले यांनी आपल्या जागा राखल्या. गोरेगावमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष मानकर यांनी आपली पकड कायम ठेवली, मात्र आपल्या मुलाला ते वाचवू शकले नाही. सालेकसा तालुक्यातही भाजप आघाडीवर आहे, तर मोरगाव अर्जुनी तालुक्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने ३ जागांवर विजय मिळविला आणि भाजपने तेवढ्याच म्हणजे ३ जागांवर कब्जा केला. एक जागा अपक्षाच्या पारड्यात गेली. सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या क्षेत्रात १२ पैकी भाजपला सर्वाधिक म्हणजे ७ जागांवर विजय मिळवून दिला.
गोंदिया जिल्हा परिषद 53 जागेचे निकाल -
भाजप – 26
शिवसेना –
राष्ट्रवादी –8
काँग्रेस – 13
इतर – 6
BJP
1) धापेवाडा - विजय उइके BJP
2) पांढरबोडी - शांता देशभर्ता - BJP
3) कामठा - रितेश मलकाम - BJP
4) रतनारा - अंजलि अटरे - BJP
5) आसोली - लक्ष्मी तरोने - BJP
6) फुलचुर - संजू टेंभरे -BJP
7) शेसगांव - पवन पटले - BJP
8) ठानेगांव - माधुरी रहांगडाले - BJP
9) सरांडी - रजनी कुंभरे - BJP
10) वडेगाव - तुमेश्वर बघेल - BJP
11) अर्जुन - चंदभागा बिसेन - BJP
12) क़ुरहाडी - शैलेन्द्र नंदेश्वर - BJP
3) सोनी - पंकज रहांगडाले - BJP
14) घोटी - प्रीति कतलाम - BJP
15) मुंडिपार - लक्ष्मण भगत - BJP
16) नवेगांव बांध - रचना गहाने -BJP
17) बोंडगांव देवी - लायकराम भेंडारकर - BJP
18) पुराडा - सविता पुराम -BJP
19) गोटाबोर्डि - कल्पना वालोदे - BJP
20) डव्वा - डॉ. भूमेश्वर पटले - BJP
21) सौंदड - निशा तोडासे - BJP
22) चिखली - कविता रंगारी - BJP
23) शेंडा - चंद्रकला डोंगरावर - BJP
24) किकरिपार - किशोर महारवाड़े - BJP
25) ठाना - हनुमंत वट्टी - BJP
26) महागांव - जयश्री देशमुख - BJP
CON
1) सहारवानी - जितेंद्र कटरे - CON
2) निंबा - शशि भगत - CON
3)माहूरकुडा - कविता कापसे - CON
4) भरेगाव - संदीप भाटिया - CON
5) ककोडी - उषा शहारे - CON
6) चिचगड - राधिका धर्मगुडे - CON
7) झालिया - छाया नागपूरे - CON
8) पिपरिया - गीता लिल्हारे - CON
9) कारुटोल - वंदना काळे - CON
10) तिरखेड़ी - विमल कटरे - CON
11) गोरठा - छनुबाई ऊके - CON
12) अंभोरा - उषा मेंढे - CON
13) केशोरी - श्रीकांत घाटबांधे - CON
NCP
1) बिरसोल - नेहा तुरकर - NCP
2) एकोडी - अश्वनी पटले - NCP
3) कुडवा - पूजा शेट -NCP
4)सुकड़ी - जगदीश बावंथड़े - NCP
5) कवलेवाडा - किरण पारधी - NCP
6) गोठणगाव - यशवंत गनवीर - NCP
7) पांढरी - सुधा रंहागडाले NCP
8) घाटटेमनी - सुरेश हर्षे - NCP
चाबी संघटन
1) पांजरा - वैशाली पंधरे- CHAB
2) काटी - आनंदा वाढीवा - CHABI
3) पिंकेपार - दीपा चन्द्रिकापुरे - CHAB
4) खमारी - ममता वाढवे - CHABII
अपक्ष
1) नागरा - रूपेश कुथे -
2) इटखेडा - पौर्णिमा ढेंग
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.