Vidhan Parishad Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhan Parishd MLA News: लवकरच 'हे' 21 आमदार होणार 'रिटायर्ड'; अपात्रतेची टांगती तलवार असलेल्यांचाही समावेश

Political News : विधान परिषदेतील 21 आमदार जुलै महिन्यापर्यंत टप्याटप्याने येत्या तीन महिन्यांत निवृत्त होणार आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना विधान परिषदेतील 21 आमदार जुलै महिन्यापर्यंत टप्याटप्याने येत्या तीन महिन्यांत निवृत्त होणार आहेत. या आमदारांना गुरूवारी निरोप देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक आठ जण भाजपचे आहेत तर त्यानंतर सहा जण शिवसेनेचे असून तीन शिंदे गटाचे तर तीन ठाकरे गटाच्या आमदारांचा समावेश आहे.

विधान परिषदेतील 21 आमदार जुलै महिन्यापर्यंत टप्याटप्याने येत्या तीन महिन्यांत निवृत्त होणार आहेत. त्यापैकी एक आमदार 31 मे 2024 रोजी निवृत्त होणार आहेत तर पाच आमदार 21 जून 2024 तर चार आमदार 7 जुलै 2024 रोजी तर 11 आमदार 27 जुलै 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापैकी 10 आमदारांचा गुरुवारी निरोप समारंभ होणार आहे.

रिक्त होणाऱ्या 21 जागाचं भवितव्य विधानसभा निवडणुकीवर अवलंबून असणार आहे. विधानपरिषदेत पुन्हा वर्णी लागण्यासाठी अनेक आमदार पक्षांतर करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अपात्रतेची टांगती तलवार असलेले अनेक आमदार या यादीत असल्याने हा मुद्दा येत्या काळात निकाली काढला जाण्याची शक्यता आहे.

या आमदारांचा आहे समावेश

स्थानिक प्राधिकारी संस्थामधून निवडून आलेले सहापैकी अनिकेत तटकरे हे 31 मे 2024 रोजी निवृत्त होत आहेत तर नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बाजोरिया, प्रवीण पोटे-पाटील व सुरेश धस हे पाच आमदार 21 जून 2024 रोजी निवृत्त होणार आहेत.

पदवीधर मतदारसंघातील विलास पोतनीस, निरंजन डावखरे, शिक्षक मतदारसंघातील किशोर दराडे, कपिल पाटील हे चार आमदार 7 जुलै 2024 रोजी निवृत्त होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा सदस्यांतून निवडून गेलेले मनीषा कायंदे, विजय गिरकर, बाबाजानी दुराणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा अथर, प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत पाटील हे सर्व 11 आमदार 27 जुलै 2024 रोजी निवृत्त होणार आहेत.

सर्वाधिक आठ आमदार भाजपचे

सर्वाधिक आठ जण भाजपचे (Bjp) आहेत तर त्यानंतर सहा जण शिवसेनेचे (shivsena) असून तीन शिंदे गटाचे तर तीन ठाकरे गटाचे आहेत. तर दोन जण काँग्रेसचे तर दोन जण राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) आहेत, त्याशिवाय जनता दल, राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष, पिझन्टस वर्क पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT