Loksabha Election 2024 : परभणीत महायुतीचे कमळ कुणाच्या हाती? भाजपकडून निवडणुकीची 'फूलटू' तयारी

Parbhani Loksabha Constituency : परभणी मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे असायचा, यावेळी शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसची दोन तुकडे झाले, काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये गेल्याने राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहे
Meghna Bordikar, Sanjay Jadhav, Rajesh Vitekar, Subhash Kadam
Meghna Bordikar, Sanjay Jadhav, Rajesh Vitekar, Subhash KadamSarkarnama
Published on
Updated on

Parbhani BJP News :

लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी महिनाभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात जोर लावला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीकडून अजून उमेदवारांची घोषणा झाली नसली सर्वांची उत्कंठा वाढली आहे. आधी शिवसेनेत पडलेली फूट त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्यामुळे परभणी मतदारसंघ पहिल्यांदा भाजपकडे आला असला तरी उमेदवार न ठरल्याने मतदारांचीही उत्कंठा वाढली आहे.

Meghna Bordikar, Sanjay Jadhav, Rajesh Vitekar, Subhash Kadam
Basavraj Patil News : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; मराठवाड्यातील बड्या नेत्याचा राजीनामा

शिवसेना-भाजप युती असताना परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Loksabha Constituency) शिवसेनेच्या वाट्याला असायचा. मतदारांनीही शिवसेनेच्या उमेदवाराला नेहेमीच निवडून दिले. पण आता राज्याच्या राजकीय पटलावर न भूतो न भविष्यति अशी उलथापालथ झाली. शिवसेना-भाजप युती तुटली, शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये गेले. त्यामुळे यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) हेच महाविकास आघाडीचे (MVA) संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपला निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी मिळाली आहे. पक्षाने लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर (Ramprasad Bordikar) यांची नियुक्ती केली तर समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्यावर जबाबदारी सोपवली. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नसले तरी भाजपने परभणीच्या जागेसाठी पूर्ण तयारी केल्याचे चित्र आहे.

2014आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election) विजयाचा अनुभव असलेले खासदार संजय जाधव तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी तुल्यबळ लढत देणारा उमेदवार देण्यासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात मंथन चालू आहे.

जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचे नाव आघाडीवर असले तरी पक्षातील अनेक नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. समन्वयक डॉ. सुभाष कदम (Subhash Kadam) यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच बाबासाहेब जामगे यांच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या उमेदवारीसाठी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. तसेच परभणीतील नेत्यांनीही पत्रकार परिषद घेत पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाकडून मात्र उमेदवारी संदर्भात कुठलेही स्पष्ट संकेत अजून दिले गेले नाहीत. भाजपच्या गाव चलो अभियानातही उमेदवारीसाठी इच्छूक नेत्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही परभणीसाठी जोर लावल्याने महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रबळ दावेदार राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. परभणीत झालेल्या संघ परिवारातील प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित राहून विटेकर यांनी मान्यवरांच्या भेटी घेऊन आशीर्वादही घेतले आहेत. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे दौरेही झाले आहेत. त्यामुळे आता परभणीत कुणाचा उमेदवार असेल, याची सर्वांना उत्कंठा लागून राहिलेली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Meghna Bordikar, Sanjay Jadhav, Rajesh Vitekar, Subhash Kadam
Parbhani Lok Sabha Constituency : खासदार जाधवांना निष्ठा कामाला येणार की विरोधकांचे आरोप अडथळा ठरणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com