Pankja Munde, Harswrdhn Patil, Raosaheb Danve, Mahadev Jankar Chitra wagh
Pankja Munde, Harswrdhn Patil, Raosaheb Danve, Mahadev Jankar Chitra wagh  Sarkarnama
महाराष्ट्र

Video Vidhanparishad Election News : भाजपकडून विधानपरिषदेसाठी कोणाला लागणार लॉटरी ? शिंदे गट, काँग्रेसकडून 'या' नावांची चर्चा

Sachin Waghmare

Bjp News : आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून एक नाव फायनल करण्यात आले आहेत तर उर्वरित चार जागांसाठी 10 नावांपैकी चार जणांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून व काँग्रेसकडून जवळपास नावे निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.

लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर आता लवकरच आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11जागेसाठी निवडणूक होत आहे. 12 जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. (Vidhanparishad Eelection News)

विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत तर अजित पवार गटाच्या वाट्याला दोन तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहेत. भाजपकडे येणाऱ्या पाच जागांसाठी 35 जणांनी उमेदवारी भाजपकडे मागितली होती. या पैकी पाच नावे फायनल केली जाणार आहेत.

दिल्लीत नावे निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित सोमवारी रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली. यामध्ये जवळपास पाच जणांची नावे निश्चित करण्यात आली असल्याचे समजते.

यापूर्वी मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या 35 जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली होती. विधान परिषद निवडणूक 12 जुलै रोजी होणार आहे. फायनल करण्यात आलेल्या या पाच नावाची अधिकृत घोषणा लवकरच दिल्लीतून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपकडून (Bjp) लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या महादेव जानकर यांना पुन्हा संधी मिळणार आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर उर्वरित दहामधून चार जणांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde), हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, परिणय फुके, सुधाकर कोहळे, अमित गोरखे, निलय नाईक, योगेश टिळेकर, माधवीताई नाईक या दहांपैकी चार नावे फायनल केली जाणार असल्याचे समजते.

भावना गवळींची चर्चा...

शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार असलेल्या दोन जागापैकी एका जागेवर मुदत संपत असल्याने माजी खासदार भावना गवळी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासोबतच काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी नसीम खान, मुझफ्फर हुसेन यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT