NCP Vs BJP in Pune : 'देवेंद्रजी वायफळ बोलणाऱ्यांना आवर घाला..' ; अजितदादा समर्थकांचा भाजपला सूचक इशारा!

NCP Pune City President Deepak Mankar to Devendra Fadnavis : शिरूरमध्ये जर भाजपाने योग्य प्रकारे काम केलं असतं तर आढळराव पाटील निवडून आले असते, असंही दीपक मानकरांनी बोलून दाखवलं आहे.
Deepak Mankar to Devendra Fadnavis
Deepak Mankar to Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune NCP Vs BJP News : महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढा, अजित पवारांमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना भाजपाच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

त्यामुळे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमने-सामने आला असून भाजप पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना दीपक मानकर म्हणाले, 'सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास गतिमान रित्या सुरू आहे.मात्र अशातच कुठल्यातरी बैठकीत एखादा कार्यकर्ता अजित पवार यांना महायुतीतील बाहेर काढा अशी वक्तव्य करत असेल तर त्याने आपली प्रथमतः पात्रता काय आहे हे पाहावं.'

तसंच 'भाजपचे सुभाष देशमुख आमदार राहुल कुल यासारखे नेते या बैठकीला असतील तर त्या नेत्यांनी अशा कार्यकर्त्यांना आवर घालण्याची गरज होती. तसं झालं नाही त्यामुळे या गोष्टीचा मी निषेध करत आहे.' असंही ते म्हणाले.

Deepak Mankar to Devendra Fadnavis
Ajit Pawar Vs BJP : अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; फडणवीसांचे निकटवर्तीय भाजप पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल

याचबरोबर 'अशा प्रकारची वक्तव्य आम्हाला देखील करता येतात. मात्र महायुती म्हणून आम्ही सातत्याने प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. पुणे लोकसभेमध्ये महायुतीचा जो विजय झाला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा होता. मात्र शिरूरमध्ये आढळराव पाटील(Shivajirao Adhalrao Patil) यांना पराभव स्वीकारावा लागला.'

शिरूरमध्ये जर भाजपाने योग्य प्रकारे काम केलं असतं तर आढळराव पाटील निवडून आले असते. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिरूर मध्ये भाजपचे कार्यकर्ते कुठेही दिसले नाहीत त्यांचा कसलाही प्रकारचा प्रभाव तिथे जाणवला नाही. त्यामुळे आपल्या खालचा अंधार लपवण्यासाठी शिरूर मधील कार्यकर्ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचं मानकर म्हणाले.

Deepak Mankar to Devendra Fadnavis
Ajit Pawar : अजितदादांकडे पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी मागितली विधानपरिषदेची जागा !

मानकर पुढे म्हणाले, काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर त्यांना तशा प्रकारचा उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस देईल. अजित पवार(Ajit Pawar) हे राष्ट्रीय नेते असून गल्लीबोळतल्या कार्यकर्त्यांच्या अशा विधानांनी त्यांना कसलाही फरक पडणार नाही.

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचं सांगणं आहे की अशा प्रकारची वायफळ बडबड करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी समज देऊन आवर घालावा. अशा प्रकारची वक्तवे ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची ठरू शकतात. असं दीपक मानकर म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com