vidhanparishad Election  Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhanparishd Election News : मुंबई, कोकण पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी पुन्हा निवडणूक जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान

Political News : निवडणूक आयोगाने शुक्रवारी या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार आता 26 जून रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी केली जाणार आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर शिक्षक संघटनेच्या मागणीनंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. शुक्रवारी निवडणूक आयोगाने (Election Commision) या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार आता 26 जून रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी केली जाणार आहे.

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक (Teacher election ) या चार मतदारसंघांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या चार जागांसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी हॊणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (Vidhanparishd Election News)

यापूर्वी शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती. त्यानंतर निवडणूक पुढे ढकलली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'या' चार मतदारसंघासाठी होणार निवडणूक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ३१ मे पासून दाखल करता येणार असून ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर उमेदवारी अर्जाची छाननी १० जूनला होणार आहे. उमेदवारी १२ जूनपर्यंत मागे घेता येणार आहे तर या चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.

SCROLL FOR NEXT