Sharad Pawar News : 'जागे झाले नाही तर इतर मार्ग आहेत', शरद पवारांचा सरकारला इशारा

Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र, पुणे विभागतील परिस्थिती चिंताजनक आहेत. मोठी धरणांमध्ये संभाजीनगरमधील धरणांमध्ये 10 टक्के पाणी आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे आरोप होत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ परिस्थितीमध्ये आचारसंहितेमुळे मदत करता येत नसल्याने आचारसंहित शिथिल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

दुष्काळ परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री CM Eknath Shinde बैठका घेत आहेत मात्र दोन उपमुख्यमंत्री काही दिसत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शरद पवार म्हणाले, आता आम्ही तुमच्या मार्फत राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतो आहोत. येवढं करून जागे नाही झाले तर इतर मार्ग आहेत.

Sharad Pawar
Ravindra Dhangekar : धंगेकरांचा पोलिस स्टेशनमधून ग्राउंड रिपोर्ट, पोलिसांच्या 'कारभारावर'ठेवलं बोट; थेट पुरावाच दाखवला

'छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र, पुणे विभागतील परिस्थिती चिंताजनक आहेत. मोठी धरणांमध्ये संभाजीनगरमधील धरणांमध्ये 10 टक्के पाणी आहे. तर, पुणे विभागातील धरणांमध्ये 35 टक्के,नाशिकमधील धरणांमध्ये टक्के 22 पाणी आहे.', असे सांगत या विभागात किती टँकर सुरू आहेत? याची आकेडवारीच शरद पवारांनी Sharad Pawar मांडली. तसेच या संकटात सरकारला सहकार्य करण्याची भूमिका मांडली.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यकर्त्यांची मानसिकता कळते

शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, मनुस्मृती घेण्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात शरद पवारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, यावरून राज्यकर्त्यांची मानसिकता काय आहे ते स्पष्ट होते. शिक्षण क्षेत्रातील जानकारांनी या विषयाची आग्रहाची भूमिका सरकारपुढे घ्यावी. प्रागतीक विचारांच्या शिक्षणसंस्था गप्प बसणार नाहीत.

Sharad Pawar
Ranajagjitsinha Patil: वडिलांना रुग्णालयात सोडून भाजप आमदाराने केली नुकसानीची पाहणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com