Chandrashekhar Bawankule1 Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule Vs MVA : बावनकुळेंनी टायमिंग साधलं, 'मविआ'त हाणामारी सुरू

BJP reaction to ShivSenaUBT leaders meeting and MVA backlash : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मातोश्रीवर नेत्यांची तातडीची बैठक बोलवल्यावर मुंबईत 'हाय व्होलटेज' राजकीय घडमोडींना वेग आला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीतील शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मातोश्रीवर नेत्यांची तातडीची बैठक घेत असल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. महाविकास आघाडीतील नेते संभ्रमात पडले असून, 'मातोश्री'वर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबईतील 'हाय व्होलटेज' राजकीय ड्रामाचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टायमिंग साधत 'मविआ'त हाणामारी सुरू झाल्या आहेत, असा टोला लगावला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये (Congress) विदर्भातील जागा वाटपावरून वाद विकोपाला पोचू लागला आहे. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काल उद्धव ठाकरे यांच मातोश्रीवर भेट घेतली. त्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले समोर आले. काही तासांच्या या घडामोडीनंतर संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेला दाखल देत नेत्यांच्या तातडीच्या बैठकीची माहिती दिली.

आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला रवाना

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ही बैठक आयोजित केली असतानाच शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले. त्यामुळे मुंबईतील गरमासामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची आदित्य ठाकरे आणि अनिल परब भेट घेणार आहेत. काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आलं आहे. 'मविआ'मधील धुसफूसवर महायुतीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते प्रवीण दरेकर, शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

बावनकुळे यांचा 'मविआ'ला टोला

चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'मविआ'त सक्षम नेतृत्व नसल्याने त्यांच्यात हाणामारी सुरू झाली आहे. अशी वेळ येईल, याची आम्हाला कल्पना होती, असा टोला लगावला. मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आता बैठका होतील. गाठीभेटी होणार, अशी प्रतिक्रिया दिली.

आदित्य यांनी वादावर बोलणं टाळलं

आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेण्याचे कारण सांगताना जाहिरनाम्यातील काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. परंतु काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जागा वाटपाच्या वादावर चर्चा करण्यास नकार दिला. तसंच काँग्रेसने काही जागांवर वाद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली हायकमांड यांचे मार्गदर्शन घेऊन. दिल्लीतील आजच्या बैठकीनंतर 'मविआ'च्या उद्याच्या बैठकीत भूमिका मांडू, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT