Ajit Pawar: राष्ट्रवादीत बंडांचे निशाण? अजितदादांची साथ सोडणार, हडपसरमधून 'हा' नेता अपक्ष लढणार; VIDEO पाहा

Hadapsar Assembly election 2024 Anand Alkunde vs mla Chetan Tupe: हडपसरमधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक दादाची साथ सोडणार आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आता कोणत्या ही क्षणी पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर नाराज असलेल्या इच्छुकांकडून अनेक ठिकाणी बंडाचे निशाण फडकवले जात आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आनंद अलकुंडे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. आपण हडसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आनंद अलकुंडे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. ते माजी नगरसेवक देखील आहेत. त्यांच्यासोबतच इतर चार माजी नगरसेवक देखील पक्षाची साथ सोडणार असल्याचं बोलत जात आहे.

हडपसरमधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक दादाची साथ सोडणार आहेत. मंगळवारी शक्ती प्रदर्शन करीत आनंद अलकुंटे हडपसरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

आनंद अलकुंडे हे सलग तीन वेळा पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून चांगल्या मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी पीएमपीएलचे संचालक म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांचा स्थानिक पातळीवर जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आनंद अलकुंडे हे महायुतीच्या उमेदवारासाठी हडपसरमधून डोकेदुखी ठरणार हे निश्चित मानले जात आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवारांना सुटेल, असं जवळपास निश्चित मानले जात आहे. मतदारसंघातून विद्यमान आमदार चेतन तुपे यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार चेतन तुपे हे कधी शरद पवार गटाच्या बाजूने तर कधी अजित पवार गटाच्या बाजूने झुकताना दिसले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ते संपूर्णपणे अजित पवारांसोबत राहिले असले तरी लोकसभा निकालानंतर ते पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या दरम्यानच्या काळात आल्या होत्या.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा त्यांना उमेदवारी देणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

अशातच आता पक्षातील एका माजी नगरसेवकांनी मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरून आव्हान निर्माण केल्याने महायुतीसाठी या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक काही प्रमाणात आणखीच कठीण झाली आहे. आता अजित पवार यांच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com