Eknath shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhansabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती भाजपचा झेंडा; प्रचारासाठी अहोरात्र झटणार

Vidhansabha Election Cm Eknath Shinde : भाजपच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिंगणात उतरणार आहेत.

Sachin Waghmare

Vidhansabha Election BJP Campaign : आगामी काळात होत असलेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यातील निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला नुसता पाठिंबा न देता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट निवडणूक प्रचारार्थ उतरणार आहे. त्यामुळेच भाजपच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती लोकसभेतील शिंदे गटाचे गट नेते तथा खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

राजस्थानमधील निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी होती. मात्र एकनाथ शिंदे आता भाजपच्या प्रचारासाठी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता राजस्थान विधानसभा निवडणूक रिंगणातून शिंदे गटाचे उमेदवार माघार घेणार असल्याचे समजते. राजस्थानसह इतर राज्यात शिंदे गटाने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

दरम्यान. या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याबाबतचे पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी, नड्डा यांना दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे येत्या काळात भाजपचा प्रचार करणार असल्याचा निर्णय खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपच्या नेतृत्वाला कळवला आहे.

शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना हा भाजपचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असून शिवसेना त्यांचा सर्वात जुना मित्र पक्ष आहे. यापूर्वी पंजाबमधील अकाली दल हा जुना पक्ष होता. मात्र हा पक्ष सध्या तरी भाजपसोबत नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही इंडियामध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे शिंदे गट हा भाजपचा जुना मित्र आहे. त्यामुळे भाजपचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

भाजप नेतृत्वाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

राज्यातील आमदाराच्या अपात्रतेबाबतची सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच दहाव्या परिशिष्टातील तरतुदी पाहता नव्या वर्षात शिंदे गटाच्या अस्तित्वात बाबत शंका निर्माण व्हावी, असेच चित्र आहे. त्यामुळेच येत्या काळात भाजप नेतृत्वाच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT