Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार, कोणाचा पत्ता कट होणार याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यापैकी कुणाला तिकीट मिळणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार असतील, हे जाहीर झाल्याने येथील सस्पेन्स संपला आहे. (Vijay Vadettivar News)
दिवंगत काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या प्रतिभा या पत्नी आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा होत आहे. चंद्र्पूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यावेळेसपासून पोटनिवडणूक झाली तर लढण्याची तयारी प्रतिभा धानोरकर यांनी केली होती.
धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. शिवानीने उमेदवारी मागितली होती. पण ती दिली गेली नाही. मला शक्य असेल तिथे प्रचारासाठी जाईल. मी काँग्रेसचा नेता आहे. मला महाराष्ट्रभर काम करायचे आहे. संकटाच्या वेळेस महाराष्ट्र उभा राहिला आहे. दिल्लीला हादरे देण्याची हिंमत आणि शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे, असे या वेळी वडेट्टीवार यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाचही लढती काँग्रेससाठी अनुकूल
पुरोगामी विचाराला घेऊन चालणारा विदर्भ हा कायम काँग्रेस सोबत राहिलेला आहे. संकटाच्या वेळेससुद्धा काँग्रेसला (Congress) विदर्भातील प्रचंड अशी साथ दिली आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही लढती काँग्रेससाठी अनुकूल असल्याचे या वेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
चारही ठिकाणी भाजपबरोबर लढत
विदर्भातील चारही ठिकाणी भाजपबरोबर लढत आहे. पूर्व जनतेने मनात ठरवलेला आहे, यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचे आणि या पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी व्यक्त केला आहे.
R