Congress Lok Sabha Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने फक्त तीन जणांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यात राज्यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एकमेव खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकरांचे (Pratibha Dhanorkar) नाव फायनल केले आहे. यामुळे लोकसभेसाठी जोरादार फिल्डिंग लावणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता चंद्रपूरमधून काँग्रेसचे धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Pratibha Dhanorkar
काँग्रेसने (Congress) शनिवारी (ता. 23) चौथ्या यादीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोऱ्या जाणाऱ्या चार जागांवरील उमेदवार घोषित केली होती. त्यात वादाच्या चंद्रपूर जागेचा निर्णय झालेला नव्हता. त्यानंतर काँग्रेसने रविवारी (ता. 24) देशातील फक्त तीन जणांची यादी जाहीर केली. यात राजस्थानमधील दोन तर राज्यातील चंद्रपूर जागेचा समावेश आहे.
चंद्रपूर मतदारसंघावर आमदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दावा केला होता. परिणामी काँग्रेसमध्ये या जागेचा वाद सोडवणे कळीचा मुद्दा ठरला होता. मात्र पाचव्या यादीत काँग्रेसने प्रतिभा धानोरकरांना संधी दिली आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काँग्रेसने चौथ्या यादीत नागपुरातून माजी महापौर आणि शहर काँग्रेसचे प्रमुख विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे. रामटेकमधून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांना संधी दिली. बर्वे या मुकुल वासनिक, सुनील केदार यांच्या निकटवर्तीय आहेत. गडचिरोली या गेल्या काही निवडणुकात भाजपला साथ देणाऱ्या मतदारसंघात डॉ. नामदेव किरसन यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही राज्यभर प्रचाराची जबाबदारी असल्याने भंडारा-गोंदिया या मतदारसंघात स्वत: न लढता डॉ. प्रशांत पडोळे यांना रिंगणात उतरवले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.