Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettivar News : वडेट्टीवारांची मोठी घोषणा; 'मविआ'च सत्तास्थापनेचा दावा करणार, बारा तासांतच मुख्यमंत्रीही ठरणार

Political News : दोनदा विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेले आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे. मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली असल्याचे त्यांनी सांगितले.

Sachin Waghmare

Nagpur News : उद्या सत्तेतला आमदार म्हणून मी राहील, असा मला विश्वास वाटतो. विश्वास नाही तर खात्री आहे. महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा दावा उद्या रात्रीच करणार आहोत. 160 ते 165 जागा महाविकास आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही, एक्झिट पोल वगैरे नंतर बघू. सगळ्या लोकांना उद्याच्या काउंटिंगसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितले आहे. पूर्ण मतमोजणी होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचे नाही, अशा सूचना दिलेल्या आहेत, असे काँग्रेस नेते व राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

कोण सत्तेत येईल ते उद्या कळेलच, उद्या बारा ते एक वाजता चित्र स्पष्ट होईल आणि महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेले तुम्हाला दिसेल. कुठल्याही पदाबाबत हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे. दोनदा विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेल आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे. मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्या सत्ता येणार आणि सत्तेमध्ये मी असणार आहे. जे काम हाती घेतलं ते काम प्रामाणिकपणे पूर्ण केला बारा तासाच्या आत मुख्यमंत्रीपद आम्ही घोषित करू. उद्या सगळ्यांना आम्ही उद्या रात्रीचा मिळेल. त्या व्यवस्थेत बोलावलेल आहे आणि विदर्भाची जबाबदारी सर्वांना घेऊन जाण्याची माझ्यावर हायकमांडने सोपवलेली आहे. आज बैठक जबाबदारीची होती, कालच्या मीटिंगमध्ये काय करायच, या बाबत पवार साहेबांचे मार्गदर्शन लाभलं आहे. खर्गे आम्हाला वारंवार सूचना करत असल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी सांगितले.

कोणी कोणती जबाबदारी पार पाडायचे हे ठरलेले आहे. परवा सत्ता स्थापनेचा मंडप दिसेल. 12 तासात महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार, असाही दावा त्यांनी केला. जेवढे काँग्रेस विचारसरणीची मंडळी आहेत, त्यांच्याशी ते आमचेच आहेत. बंडखोरी केली असेल किंवा अपक्ष असतील त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्यात आहे. त्यांच्याबाबत पक्ष श्रेष्ठींच्या चर्चा सुरू केली असावी.

काँग्रेसला (Congress) मुख्यमंत्रीपद भेटावं हे काँग्रेस जणांची इच्छा आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे त्यांची इच्छा आहे, पण तीनही एकत्र येऊन जो निर्णय होईल तो अंतिम असेल, उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, कुटुंब प्रमुख एकच असतो आणि तो कुटुंबप्रमुखांमध्ये तीन घर असतात. तेव्हा एक कुटुंब प्रमुख सर्वानुमते ठरवू, असेही वडेट्टीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT