Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील सत्तेची चावी असणार अपक्षांच्या हाती; सोलापुरातील 'या' उमेदवारांवर असणार 'वॉच'

Solapur Political News : बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी निकाल लागणार आहे. तत्पूर्वीच राज्यात सत्ता कशी स्थापन करता येणार यासाठी नेतेमंडळीची धावपळ सुरु आहे.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दोन महिन्यापासून राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडाला होता. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी निकाल लागणार आहे. तत्पूर्वीच राज्यात सत्ता कशी स्थापन करता येणार यासाठी नेतेमंडळीची धावपळ सुरु आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात कोणत्याच पक्षाला एकहाती सत्ता मिळेल असे चित्र सध्या दिसत नसल्याने महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील गोटात हालचालींना वेग आला आहे. महायुती व मविआच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांना फोनाफोनी सुरु झाली असून सोलापूर जिल्ह्यातील तीन अपक्ष उमेदवारांना फोन गेल्याने येत्या काळात अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारणार असे दिसत आहे.

Maharashtra Assembly Election
Vinod Tawde : विनोद तावडेंनी मानले शरद पवारांचे आभार, नेमकं कारण काय?

राज्यातील सरकार स्थापन करण्यासाठी येत्या काळात अपक्षांची मदत लागणार असे चित्र आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांना फोनाफोनी सुरु झाली आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील तीन अपक्ष निवडून येण्याची शक्यता असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. माढा, करमाळा आणि सांगोला मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना दोन्ही बाजूकडून निरोप येण्यास सुरुवात झाल्याचे समजते.

Maharashtra Assembly Election
Shivsena News : मोठी बातमी, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा पाठलाग, वाहनावर गोळीबार; नेमकं काय घडलं, तिघांविरोधात गुन्हा दाखल

सांगोला मतदार संघातून शेकापकडून (SKP) निवडणूक लढवणारे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे संभाव्य विजेता उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. सध्या या सर्वच अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूच्या पक्षांचे विशेष प्रयत्न आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणच्या नेत्यांचे फोन आल्याची माहिती यातील एका उमेदवाराने दिली.

दोन्हीकडील नेत्यांनी आपल्याचसोबत राहावे असा आग्रह धरला जात असल्याचे समजते. सांगोल्याचे शेकापचे बंडखोर उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी आपल्याला आग्रह केल्याची माहिती दिली. 23 तारखेनंतर आमचा पक्ष जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. तर मला माझ्या विजयाची पूर्ण खात्री असल्याचेही देशमुख म्हणाले.

Maharashtra Assembly Election
Kolhapur Politics : सतेज पाटील-महाडिक एकाच पोस्टरवर झळकले, कार्यकर्त्यांना बसला धक्का!

माढा विधानसभा मतदारसंघाचे सलग सहावेळा प्रतिनिधीत्व केलेले बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात होते. तर रणजीत शिंदेच येथून विजयी ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे करमाळा विधानसभा मतदारसंघात रणजीत शिंदेंचे चुलते असलेले अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेही यावेळी पुन्हा रिंगणात होते. या दोन्ही मोठ्या नेत्यांकडे दोन्ही आघाड्यांचे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे येत्या काळात या तीन उमेदवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Maharashtra Assembly Election
Congress On Vinod Tawde : '...म्हणून तावडेंना तत्काळ अटक करा!'; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची पैसे वाटप प्रकरणात अखेर 'एन्ट्री'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com