Farm Loan Waiver Sarkarnama
महाराष्ट्र

Farm Loan Waiver : शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी, 'तो' एक शब्द नाही; काँग्रेस नेत्याने सगळं उलगडून सांगितलं

Vijay Wadettiwar Farm Loan Waiver : सरकारने दिलेला कर्जमाफी दिली आहे. मात्र, ही कर्जमाफी फसवी असल्याची टीका काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Roshan More

Farm Loan Waiver : सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीमुळे तब्बल 55 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, ही कर्जमाफी फसवी असल्याचे हल्लाबोल काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

'या कर्जमाफीमध्ये एक शब्द नसल्यानी ती फसवी आहे. या कर्जमाफीमध्ये 'सरसकट' हा शब्द नाही.', अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

'या सरकारकडे आहे काय कर्जमाफी करण्यासाठी, असा सवाल देखील त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, आम्ही केलेल्या कर्जमाफीमधील २०१९ च्या लोकांना त्यांनी वगळले. आम्ही ५० हजार प्रोत्साहन देत होतो त्यांची संख्या देखील कमी करून टाकली आहे.'

'ही सरसकट कर्जमाफी नाहीये. ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे या कर्जमाफीचा थेट फायदाच होणार नाहीये. ती जे संख्या सांगतायेत ती यामध्ये बसणार नाही. ५५ लाख सांगतायेत मात्र फारतर ही संख्या १५-२० लाखांच्या घरात जाईल. ही बनावट आणि फसवी कर्जमाफी आहे.', असे देखील ते म्हणाले.

सरकारला चटके बसतील

काँग्रेसने देशाला चुलीकडून गॅसकडे नेलं, देशाला पुन्हा गॅसकडून चुलीकडे नेणे हेच भाजपाचे धोरण आहे. सध्या गॅस सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे, पुढील एक - दोन महिन्यांत ही किंमत १५०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जनतेवर पुन्हा चूल पेटवण्याची वेळ येणार आहे, या चुलीचे चटके सरकारला बसल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT