Vijay Wadettiwar 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : 'महायुतीमधील नेत्यांची तोंडाची गटार..'; खासदार बोंडेंच्या विधानावर विजय वडेट्टीवार संतापले

Vijay Wadettiwar demand for criminal action against the leaders of the Mahayuti who made provocative statements against Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक विधान करणाऱ्या महायुतीमधील नेत्यांवर फौजदारी कारवाईची विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरोधात महायुतीमधील नेत्यांकडून प्रक्षोभक विधानांची दखल घेऊन कारवाईची पंतप्रधान नरेंद्र मोंदीकडे मागणी होत असतानाच, अशा विधानांचा 'सिलसिला' सुरूच आहे.

अशा विधानांच्या प्रकारांवर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली, तरी देखील भाजप खासदारने राहुल गांधींविषयी पुन्हा प्रक्षोभक विधान केलं आहे. या विधानांवर आता काँग्रेस नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी महायुतीमधील नेत्यांवर संतापले आहेत.

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी तिथं आरक्षणावर आणि शीख समाजाविषयी चिंता व्यक्त करणारं विधान केलं होते. यावरून भाजपने (BJP) वेगळाच अर्थ काढून, गदारोळ सुरू केला, तसा काँग्रेसचा आरोप आहे. यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने देशभरात आंदोलन छेडलं. भाजपच्या या आंदोलनाला काँग्रेसने देखील जशास तसं उत्तर दिलं. परंतु आता राहुल गांधी यांच्या विधानाचा वेगवेगळा अर्थ काढून महायुतीमधील नेत्यांनी प्रक्षोभक विधान करण्यास सुरवात केली आहे. तशी महायुतीमधील नेत्यांमध्ये स्पर्धाच सुरू झाल्याचं चित्र आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं. या विधानावरून राज्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. यानंतर भाजपचे राज्यसभेवरील खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा वापरली आहे. यावर राज्यातील काँग्रेस नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फौजदारी गुन्हे नोंदवून अटक करण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधींच्या मागण्यांमुळे भाजपला राजकीय चटके

विजय वडेट्टीवारा यांनी यासंदर्भात 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली आहे. यात भाजप आणि महायुतीला राहुल गांधी यांची भूमिका कोठे झोंबली, यावर लक्ष वेधलं. यातूनच महायुतीमधील नेत्यांची तोंडाची गटार बंद होत नाही, असा तिखट मारा विजय वडेट्टीवार केला. संविधान रक्षणाची भाषा आणि जातनिहाय जनगणना करण्याची राहुल गांधी यांच्या मागणीमुळे महायुती भाजपला राजकीय चटके बसलेत. म्हणून खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यातून राहुल गांधींबद्दल प्रक्षोभक भाषा वापरत आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

...तर खासदार बोंडेंची हिंमत झाली नसती!

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींबद्दल प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई व्हावी. आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून देखील अटक का होत नाही, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. संजय गायकवाड यांना अटक झाली असती, तर अनिल बोंडे यांची असं विधान करण्याची हिंमत झालीच नसती. गल्लीतील आमदारांच्या अशा भाषेविरुद्ध राज्यातील-देशातील पोलिस प्रशासन त्यांच्याविरुद्ध कारवाई करत नाही. राज्याचे पोलिस प्रशासन गुंडगिरीची भाषा करणाऱ्या महायुतीमधील नेत्यांबद्दल कारवाई कधी करणार?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT