Vijay Wadettiwar offers Congress to Pankaja Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : नाराज पंकजा मुंडेंना काँग्रेसकडून खुली ऑफर; "भाजपमधून बाहेर पडून नेतृत्व करा..."

Vijay Wadettiwar on Pankaja Munde: राजकारणातून एक्झिट घ्यावा किंवा निवृत्त व्हावेसे वाटते, असे वक्तव्य करणाऱ्या पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येत ओबीसींचे नेतृत्व करण्याची ऑफर विजय वडेट्टीवार यांनी केला.

Roshan More

Pankaja Munde latest news today : 'जर राजकारण माझ्या मनासारखे किंवा विचारांसारखे वाटले नाही, तर जसा समृद्धी महामार्गाला बाहेर पडण्यासाठी एक्झिट असतो, तसाच मलाही वेळोवेळी राजकारणातून एक्झिट घ्यावा किंवा निवृत्त व्हावेसे वाटते.', असे विधान मंत्री पंकजा मुंडेंनी केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचा ऑफर दिली.

वडेट्टीवार म्हणाले की, ' तुम्ही (पंकजा मुंडेंनी) ओबीसींचे नेतृत्व करावे, भाजपमधून बाहेर पडावे. महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही आणि आमचा पक्ष तुम्हाला पूर्ण साथ देऊ.'

वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी त्यांना पंकजा मुंडे यांनी खरच भाजपा सोडली तर त्यांना काँग्रेसमध्ये घेणार का? असा सवाल केला. त्यावर ते म्हणाले, 'पंकजा मुंडे जर भाजपमधून बाहेर पडल्या तर आम्ही त्यांना 100 टक्के काँग्रेस पक्षात प्रवेश देऊ.'

...म्हणून 'ते' विधान

वडेट्टीवार यांनी पुढे बोलताना म्हटले की, 'त्यांना जर असे वाटत असेल की पक्षात योग्य न्याय मिळत नाही, कुटुंबाच्या त्यागाला काहीच महत्त्व दिले जात नाहीये, तर त्या नैराश्यातूनच त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचे विधान केले असावे. पण पंकजाताईंना विनंती राहील की, त्या सक्षम आणि मोठ्या ओबीसी नेत्या आहात. त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्यासारखे टोकाचे पाऊल न उचलता, बिंधास्तपणे भाजपमधून बाहेर पडा आणि राज्याच्या ओबीसी समाजाचे नेतृत्व करा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT