Election Results : भाजपला तीनपैकी दोन बालेकिल्ल्यांमध्ये धक्का; विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालात सुरूवातीचे कल विरोधात

Bankipur bypoll results, Datia bypoll results, BJP setback : बिहारच्या बांकीपूरसह मध्य प्रदेशातील दतिया येथे भाजप पिछाडीवर; प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत जन सुराज व काँग्रेस उमेदवारांची आघाडी, निकालाने सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली
BJP| Congress
BJP| CongressSarkarnama
Published on
Updated on

Assembly bypoll results : देशात एकीकडे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू असतानाच विधानसभेच्या तीन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीने सत्ताधारी आणि विरोधात आमनेसामने होते. पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. सर्वात प्रतिष्ठेची लढत असलेल्या बिहारमधील बांकीपूर मतदारसंघात पहिल्या सात फेऱ्यांमध्ये जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आघाडी घेतली आहे.

बांकीपूर मतदारसंघ

बांकीपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे सातत्याने निवडून आले आहेत. मात्र, राज्यसभेत वर्णी लागल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपने नीरज कुमार यांना उमेदवारी दिली आहे. तर प्रशांत किशोर या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत पहिल्या सात फेऱ्यांमध्ये १३ हजार ५०० मतं मिळवत प्रशांत किशोर यांनी ३ हजार ८११ मतांची आघाडी घेतली आहे. भाजपचा उमेदवार पहिल्या फेरीपासून पिछाडीवर आहे. तर राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा कुमारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. एकूण ३१ फेऱ्या असल्याने चित्र बदलू शकते, अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांना आहे.

BJP| Congress
BJP leaders : कोर्टाने भाजपच्या तीन बड्या नेत्यांना केलं मुक्त; माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदारासह कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश

दतिया मतदारसंघ

मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र, कोर्टाने एका प्रकरणात दोन वर्षांहून शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकी गेली. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने घनश्याम सिंह यांना तर भाजपने आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे नेते व माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

आता पोटनिवडणुकीतही भाजपला सुरूवातीलच्या कलांमध्ये धक्का बसला आहे. सिंग हे सुरूवातीच्या चार फेऱ्यांमध्ये ८३३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १७ हजार २९० मते मिळाली आहे. एकूण १५ फेऱ्या असल्याने या मतदारसंघातही काँटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेससह भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे.

BJP| Congress
BJP Politics : वडील खासदार, आई आमदार आता लेकाच्या मंत्रिपदासाठी भाजपने दिली आमदारकीची कुर्बानी; 'या' नेत्यासमोर लोटांगण...

मांजलपूर मतदारसंघ

गुजरातमधील मांजलपूर मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदाराच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूक भाजप विरुध्द काँग्रेस अशी थेट लढत आहे. भाजपचे उमेदवार सत्तेंद्रभाई पटेल यांनी पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये १५ हजारांहून अधिक मतांची विजयी आघाडी आहे. त्यांना २८ हजार ५०४ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार भिकाभाई राबरी यांना सुमारे १३ हजार मते आहेत. अद्याप नऊ फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com