Dharmaveer Fort And Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Dharmaveer Fort : 'स्मारकांसाठी निधी, पण धर्मवीर गडाचा विसर?', भाजप आमदाराने सरकारचे टोचले कान

BJP MLA Vikram Pachpute : नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला असून स्मारकांसाठी विशेष तरतूद करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलीय.

Aslam Shanedivan

Pune News : नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात स्मारकांसाठी विशेष तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत संगमेश्वर आणि तुळापूर या ठिकाणींचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद केली. मात्र छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात तब्बल 33 दिवस ठेवण्यात आलेल्या धर्मवीर गडाला कोणताच निधी देण्यात आलेला नाही. यावरूनच आता भाजप आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर या सरकारला या गडाचा विसर कसा पडला?, असा सवाल केला आहे.

अजित पवार यांनी सोमवारी (ता.10) राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलेल्या संगमेश्वर आणि त्यांचे बलिदान झालेल्या तुळापूरसाठी भरीव निधीची तरतूद केली. या ठिकाणांचा विकास करण्याची घोषणा केली. यानंतर आता भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी धर्मवीर गडाला विकास निधी दिला नसल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पावरील भाषणादरम्यान विधानसभेत ते बोलत होते.

तसेच त्यांनी सरकारला या गडाचे महत्व सांगताना, छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात तब्बल 33 दिवस श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडावर ठेवण्यात आले होते. तेथेच त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. ही भूमी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झाली. पण याच धर्मवीर गडाला विकास निधी देण्यास महायुतीचे सरकार कमी पडले आहे. या गडाच्या विकासासाठी कोणताही निधी या अर्थसंकल्पात देण्यात आला नसल्याची खंत पाचपुते यांनी व्यक्त केलीय.

तर छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेल्या या गडाच्या विकासासाठी निधी मिळावा. या गडाचा देखील विकास व्हावा, अशी मागणी पाचपुते यांनी सरकारकडे केली आहे. धर्मवीर गडाला निधी मिळाल्यास येथील विकास होईल. ज्यामुळे येणाऱ्या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा मिळेल, अशीही भावना पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.

तसेच पाचपुते यांनी, खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांना नमन करायचे असेल आणि ज्या भूमीत त्यांचे रक्त सांडले त्या धर्मवीर गडाचा देखील विकास व्हायला हवा असंही मत आमदार पाचपुते यांनी व्यक्त केल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT