Ajit Pawar meeting : अजितदादांनी 'खोक्या'बाबत घेतला मोठा निर्णय; कारण आलं समोर...

Deputy CM Ajit Pawar Beed Delegation Satish Bhosale alleged goondaism : सतीश भोसले याच्या गुंडागर्दीविषयी बीडमधील शिष्टमंडळाने डीसीएम अजित पवार यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.
Deputy CM Ajit Pawar
Deputy CM Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : बीडमधील राजकीय गुंडगर्दी राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक आमदारांपैकी कोणाचा ना कोणाचा, तरी कार्यकर्त्याची गुंडागर्दी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या'च्या गुंडागर्दी चर्चेत आहेत.

'खोक्या'चा बंदोबस्त करण्यासाठी बीडमधील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत निवेदन देत कारवाईची मागणी केली. अजितदादांनी देखील यावर शिष्टमंडळाला आजच्या आज सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या'ला अटक होईल, असे आश्वासन दिले.

सतीश ऊर्फ 'खोक्याभाई'ची बीडमधील शिरूर आणि परिसरात असलेल्या दहशतीवर कारवाईसाठी शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. ढाकणे पिता-पुत्र यांना झालेल्या मारहाणप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम शिष्टमंडळाने अजितदादांना सांगितला. याशिवाय 'खोक्या'ने शिरूरच्या वन परिसरात केलेल्या वन्य प्राण्यांची शिकार, आणि त्यातून निर्माण केलेल्या दहशतीचे कारनामे देखील सांगितले.

Deputy CM Ajit Pawar
Maharashtra Politics : बहीण-भाऊ मंत्री झाले, अन् विरोधकांच्या डोळ्यात खुपू लागले; अजय मुंडे म्हणाले, 'संपूर्ण कुटुंब धनूभाऊच्या मागे भक्कम उभं'

बीडमधील (BEED) शिरूरमध्ये खोक्याभाईच्या गुंडागर्दीविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाची देखील माहिती अजितदादांना देण्यात आली. सतीश भोसलेवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली. खोक्याची सर्वच कुंडली शिष्टमंडळाने अजितदादांसमोर मांडली. यावर अजितदादांनी आजच्या आज खोक्याला अटक करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Deputy CM Ajit Pawar
Imtiaz Jaleel On Nitesh Rane : नितेश राणे वायफळ बडबड करणारा मंत्री! मटनाचा धंदा पारंपारिक, त्यात कशाला पडता..

संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी भाजप आमदार सुरेश धस बीडमध्ये चांगलेच आक्रमक होते. वाल्मिक कराड हत्येच्या कटात अटक असून, त्याप्रकरणी दोषारोपपत्र देखील दाखल झाले आहेत. यातच आमदार धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्या गुंडागर्दीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

राजकारण रंगणार

आमदार धस हे वाल्मिक कराडच्या कारनाम्यांविषयी काही ना काही तरी, रोज आरोप करायचे आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करायचे, आता आमदार धस यांच्याजवळील 'खोक्या'विषयी बीडच्या शिष्टमंडळाने अजित पवारांकडे तक्रार केली आहे. शिष्टमंडळाने आमदार धस यांच्याविरोधत टायमिंग साधलं असल्याची चर्चा आहे. यातच अजित पवार यांनी देखील शिष्टमंडळाला खोक्याला आजच अटक करणार असल्याचे आश्वासन दिल्याने, याप्रकरणी देखील पडद्याआडून बरच राजकीय 'वाॅर' रंगणार असल्याची चर्चा आहे.

पसार 'खोक्या'चा जामिनासाठी अर्ज

सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या'च्या अटकेसाठी बीडमधील पोलिस पथक, वन विभागाचे पथक रवाना आहे. तो पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. परंतु त्याने अटकपूर्व जामिनासाठी बीड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 'खोक्या' जामिनासाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज ठेवतो, पण पोलिसांना सापडत नाही, यावर देखील संशय व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com