Chandrapur Murder Case | Wife Kills Husband for Job sarkarnama
महाराष्ट्र

Vilas Ghule Murder Case : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट: गुन्ह्यात वापरलेली कार, चाकू SIT कडून जप्त

Vilas Ghule Case SIT : I आरोपी ज्या कारमधून घटनास्थळावर दाखल झाले होते, ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार एसआयटीने शोधून काढून जप्त केली आहे.

Roshan More

Beed News : बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला मोठे यश आले असून, गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार आणि मुख्य हत्यार चाकू जप्त करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या पुराव्यांमुळे आता विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी ज्या कारमधून घटनास्थळावर दाखल झाले होते, ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार एसआयटीने शोधून काढून जप्त केली आहे. याच कारचा वापर करून आरोपींनी गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यामुळे तपासाच्या आणि गुन्ह्याच्या रचनेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जात आहे.

आरोपीच्या शेतातून चाकू जप्त

गाडीसोबतच पोलिसांसमोर मुख्य आव्हान होते ते म्हणजे गुन्ह्यात वापरलेले हत्यार शोधण्याचे. विलास घुले यांच्यावर ज्या तीक्ष्ण चाकूने सपासप वार करण्यात आले होते, तो चाकू कुठे लपवला याचा शोध एसआयटी घेत होती. अखेर आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर, मुख्य आरोपीच्या शेतात लपवून ठेवलेला गुन्ह्यातील चाकू एसआयटीने शोधून काढला आणि तो जप्त केला.

तपास अंतिम टप्प्यात

गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि प्रत्यक्ष हत्यार दोन्हीही पोलिसांच्या हाती लागल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत आरोपींविरोधातील पुरावे आता अत्यंत मजबूत झाले आहेत. एसआयटीच्या या धडक कारवाईमुळे आरोपींचे धाबे दणाणले आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या मदतीने या पुराव्यांची पुढील तपासणी केली जात आहे. हे दोन्ही मोठे पुरावे मिळाल्यामुळे आता या हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, लवकरच न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT