Vinayak Mete Sarkarnama
महाराष्ट्र

Vinayak Mete : मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश..

मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक शंका त्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थीत करण्यात आल्या आहेत. मेटेंच्या समर्थकांनी देखील हा अपघात नाही तर घात असल्याचा आरोप केला होता. (Cm Eknath Shinde)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पोलीस महासंचालकाना दिले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या (Vinayak Mete) विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. (Maharashtra) त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक शंका त्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थीत करण्यात आल्या आहेत. मेटेंच्या समर्थकांनी देखील हा अपघात नाही तर घात असल्याचा आरोप केला होता. या सगळ्या संशयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशीचे आदेश देत तथ्य समोर आणण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, अपघात स्थळावरील परिस्थिती आणि गाडीचालक एकनाथ कदम याच्या पोलिसांना दिलेल्या जबाबातील तफावत यामुळे मेटे यांच्या गाडीला नेमका अपघात झाला की मग हा घात आहे, असा आरोप मेटे यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. आज पुण्यात मेटे यांचे भाचे आणि पुतणे यांनी पत्रकार परिषद घेत या अपघाताची चौकशी आणि त्याचा तपशील आम्हाला द्यावा, तसेच वारंवार स्टेटमेंट बदलणाऱ्या गाडीचालक एकनाथ कदम याची कसून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT