Vinod Tawde Eknath Khadse Devendra Fadnavis.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Vinod Tawde News: खडसेंची घरी जाऊन भेट, आता विनोद तावडेंचा फडणवीसांच्या CM पदाबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,'15 वर्षांपूर्वी मीच त्यांना...'

BJP News: गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

Deepak Kulkarni

Pune News: गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तसेच त्यांनी माजी मंत्री व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी मोठं विधान केलं आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार व दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या टीममधील महत्त्वाचे नेते असलेले विनोद तावडे हे श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. ते आपल्या पत्नीसह यंदाच्या वर्षीही वारीत दाखल झाले होते. त्यांनी विनोद तावडे यांचंही नाव एकेकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहिलं आहे. याच तावडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

विनोद तावडे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 15 वर्षांपूर्वी वारीत सहभागी केले असा दावा केला आहे. तसेच वारीच्याच पुण्याईने त्यांना फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची मोठी संधी मिळाली असल्याचंही तावडे यांनी बोलून दाखवले आहे.

यावर विनोद तावडे यांनी दरवर्षी आपण याच ठिकाणाहून माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतो. यंदाही आलो आहे. यावेळी माऊलींसह पंढरीच्या विठूरायाकडे राजकीय काहीही मागितलं नसल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी राज्यातील देशातील जनतेला सुखी ठेवा. आपला देश जगात नंबर एक होवो हीच मागणी आपण केल्याचं सांगितलं.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी विनोद तावडेंना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरुन प्रश्न विचारला. तसेच तुम्हांला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळावी असं वाटतं नाही का? असा तावडेंना डिवचण्याच्या उद्देशानं प्रश्नही विचारला.

यावर विनोद तावडे यांनी सावध आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सेवा करणं महत्वाचं आहे. कोणत्या पदावर जाऊन सेवा करावी असं काही नाही. मी जे मुख्यमंत्री पदावर राहून केलं असतं, तेच आज देवेंद्रजी करताहेत. मला असं वाटतं की, देवेंद्र फडणवीस काय किंवा अजून कोणी, कोणीही असो, जनतेची चांगली सेवा करणारे त्या पदावर असणं गरजेचं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री जनतेची खूप चांगली सेवा करत असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही तावडेंनी केलं.

दरवर्षी आपण याच ठिकाणाहून वारीत सहभागी होत असतो. यंदाही आलो आहे. राज्यातील देशातील जनतेला सुखी ठेवा. आपला देश जगात नंबर एक होवो हीच मागणी आपण केली आहे. राजकीय काहीही मागितले नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे त्यांच्या पत्नीसह श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेजुरीच्या खंडेरायाचा निरोप घेऊन वाल्मिक ऋषीच्या वाल्हे गावाकडे मार्गस्थ होत असताना यात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश बिडकर, राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर यांच्यासह भाजपचे स्थानिक नेतेमंडळीही वारीत दिसून आले.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात काही दिवसांपूर्वीच मुंबईत एक महत्त्वपूर्ण भेट झाली होती. विशेष म्हणजे तावडेंनी ही भेट खडसेंच्या निवासस्थानी जाऊन घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. तसेच एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीबाबत कुजुबुज सुरू झाली होती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT