Congress news : थेट भाजपच्या मुख्यमंत्र्यांना भिडणाऱ्या माजी महिला पोलीस अधिकाऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; माजी आमदारासह दहा जणांनीही हाती घेतला 'पंजा'

Thounaojam Brinda Devi, Congress Manipur : वृंदा देवी यांनी राज्यातील ड्रग्जमाफियांचे कंबरडे मोडण्याचे काम केले होते. त्यामुळे राज्यातील तरूणामध्ये त्या विशेष लोकप्रिय आहेत.
Thounaojam Brinda Devi joins congress
Thounaojam Brinda Devi joins congressSarkarnama
Published on
Updated on

Assembly election 2027 : मागील काही वर्षांपासून धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात भाजपची सत्ता असून सततच्या हिंसाचारामध्ये लोकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी असल्याचे सांगितले जाते. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षाची ताकद वाढवून भाजपला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.

देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वाधिक हिंसाचार झालेल्या मणिपूरमध्ये दोन गटांतील वादाने सतत आगडोंब उसळत आहे. त्यावरून बरेच राजकारण तापले होते. आता याच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसकडून आता विविध क्षेत्रातील लोकांना पक्षात आणत ताकद वाढविली जात आहे. सोमवारी धडाकेबाज माजी पोलीस अधिकारी वृंदा देवी यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे. त्यांच्यासह ११ जण मंगळवारी काँग्रेसमध्ये दाखल झाले.

वृंदा देवी यांनी राज्यातील ड्रग्जमाफियांचे कंबरडे मोडण्याचे काम केले होते. त्यामुळे राज्यातील तरूणामध्ये त्या विशेष लोकप्रिय आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच आपली उमेदवारीही जाहीर केली. यापूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून २०२२ मध्ये भाजपच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना संयुक्त जनता दलाने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Thounaojam Brinda Devi joins congress
Parliament news : संसदेत इतिहास घडविण्यासाठी भाजपला हवेत फक्त सहा खासदार; देशात 1986 नंतर असं पहिल्यांदाच घडणार

देवी या २०१२ च्या तुकडीच्या पोलीस अधिकारी होत्या. २०२२ च्या निवडणुकीआधी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावर त्यांनी कोर्टात गंभीर आरोप केले होते. ड्रग्जमाफियावर कारवाई करण्यापासून आपल्याला रोखले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे राज्यात त्यांची प्रचंड चर्चा झाली होती. आता काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे.

Thounaojam Brinda Devi joins congress
BJP Legal Notice : भाजपकडून आमदारांना 20-30 कोटी, मंत्रिपदाची ऑफर..! विरोधी पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांनाच अडकवलं कायद्याच्या कचाट्यात

आणखी कुणाचा पक्षप्रवेश?

काँग्रेसमध्ये सोमवारी माजी आमदार के. एच. देवेंद्र यांच्यासह, ज्येष्ठ वकील, निवृत्त पोलीस अधिकारी, निवृत्त कर्नल, निवृत्त प्राध्यापक, राज्य सरकारमधील निवृत्त अधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनी सर्वांचे स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com