Voter List Correction 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Voter List Correction : मतदार यादीवर हरकत, मतदारांना किती आहेत अधिकार? एकगठ्ठा हरकतीसंदर्भात आयोगाचा मोठा निर्णय

State Election Commission Seen Limiting Voter Rights for Voter List Corrections After Duplicate Voter Fraud Issue : राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यात मतदारांना दुरुस्ती करायची असल्याच दोनच मुद्यांनुसार ती करता येणार आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra State Election Commission : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्ताने राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांतील दुरुस्तींसंदर्भात मतदारांना दिलेल्या अधिकाऱ्यांवर चर्चा सुरू झालेली आहेत. मतदार यादीत साधारणत: दोन प्रकारच्या हरकती असू शकतात, असे राज्य निवडणूक आयोग सांगतो.

मतदार यादीत मतदाराला दोनच मुद्यांवर दुरुस्ती करून मिळणार आहे. एखाद्या दुसऱ्या मतदाराविषयी हरकत घ्यायची असल्यास, ती मतदारांना काही नियम आहेत, तर पक्षांच्या अधिकारांबाबत कोणताच उल्लेख नाही. एकगठ्ठा पद्धतीने किंवा एकत्रित यादींच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाही, हे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मतदारांना किंवा पक्षांना मतदार यादीत काही दुरुस्ती सूचवायची असल्यास ते सूचवून देखील, त्यावर कार्यवाही होणार नसल्याचं स्पष्ट होतं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वोट चोरीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. महाराष्ट्रानंतर आता बिहार निवडणुकीत या वोट चोरीच्या मुद्याचे पडसाद उमटले. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राहुल गांधी यांच्याकडे पुरावे मागितले. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन, पुराव्यांची मांडणी करून देखील, त्यावर कारवाई झाली नाही. यातच महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात गाजत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा दुबार वोट आणि वोट चोरीचा मुद्दा पुढे आला आहे. आता हा मुद्दा सर्व पक्षांनी उचलून धरला आहे. विशेष करून मुंबई महापालिकेत दुबार मतदारांविषयी (Voter) इंडिया आघाडीने मोर्चा काढून राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. राज ठाकरेंनी दुबार मतदारांविषयी मोठ्या प्रमाणात कागदपत्र दाखवली. पण राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदार हटवण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगून बाजू सारवली.

यात प्रश्न येतो तो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेष करून महापालिकांच्या निवडणुकीत प्रारूप मतदार यादी घोषित केली आहे. त्यावर हकरती मागवल्या जात आहेत. या हरकती कशा अन् कोण घेऊ शकतो, अधिकार काय, यावर काही मुद्दे समोर आले आहेत. यानुसार मतदारांना निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवर हरकत घेण्यासंदर्भात मर्यादीत अधिकार असल्याचं समोर येते. मतदार यादीत एखादी दुरुस्ती सुचवायची असेल, तर ती मतदाराला अन् पक्षाला देखील सुचवता येणार नाही.

राज्य निवडणूक आयोगानुसार मतदार यादीवर साधारणतः दोन प्रकारच्या हरकती असल्याची शक्यता आहे. स्वतः मतदाराने केलेले अर्ज आणि इतर मतदाराने एक किंवा अनेक विशिष्ट मतदाराबाबत हरकत, अशा दोन हरकती असू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागनिहाय मतदार यादींमध्ये मतदाराला कोणत्याही प्रभागात नावे समाविष्ट करण्यात आली नसल्यास किंवा चुकीच्या प्रभागात नावे समाविष्ट करण्यात आली असल्यास हरकत घेता येणार आहे.

एकगठ्ठा हरकती

अशा मतदारांनी वास्तव्याच्या पुराव्यासह नमुना "अ" मध्ये अर्ज दाखल करावा. एकाच सहकारी गृहनिर्माण संस्थेतील मतदार असतील, तर नमुना "अ" मधील अर्ज, संबंधित संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांच्यामार्फत, संस्थेच्या लेटरहेडवर, एकत्रितपणे सादर करता येणार आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत एकगठ्ठा पध्दतीने किंवा एकत्रित यादींच्या स्वरुपात हरकती दाखल करता येणार नाहीत किंवा असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

तक्रारदाराला अट असणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादीत गृहीत धरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीत नावे नसूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभागानिहाय मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली असल्यास, अशा मतदारांची नावे वगळण्याची कारवाई होऊ शकते. पंरतु तक्रारदाराला स्वतः नमुना "ब" मध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र तक्रारदार हा संबंधित प्रभागातील मतदार असावा.

नाव दुरुस्तीसाठी असा अर्ज करावा

मतदार यादीत लेखनिकांकडून नाव, लिंग यात चूक झाल्यास, मतदाराने नमुना "अ" अर्जासोबत राज्य निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटवून द्यावी. मतदाराचे स्वतःचे छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र, ज्यामध्ये मतदारांचे नांव योग्यरित्या नमूद केलेले आहे, हे सादर करता येणार आहे.

मतदारांच्या हरकतींवर सुनावणी होणार

मतदाराने स्वतः अर्ज करुन मतदार यादीत दुरुस्ती करण्याची विनंती केल्यास, सदर अर्जाबाबत आवश्यक ती चौकशी व स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घेण्यात यावा. मात्र कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने एक किंवा अनेक मतदारांबाबत नमुना "ब" मध्ये हरकत सादर केल्यास, ज्या मतदाराबाबत हरकत घेण्यात आले आहे त्या मतदाराला नोटीस काढून, त्याचे म्हणणे मांडण्यासाठी संधी दिल्याशिवाय हरकत अर्जावर निर्णय घेण्यात येऊ नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT