Bihar home department BJP : नितीशकुमारांच्या सरकारवर अंकुश? महाराष्ट्राप्रमाणे बिहारच्या खाते वाटपात खेळ झाला!

Bihar NDA Government Home Department to Remain with BJP, Says CM Nitish Kumar : बिहारमध्ये नवनियुक्त मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, गृह खाते उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे देण्यात आले आहे.
CM Nitish Kumar
CM Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Nitish Kumar Bihar NDA government : बिहारमध्ये नवनियुक्त मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, गृह खाते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याऐवजी भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच गृह खात्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्याकडे देण्यात आली आहे.

महाराष्ट्रामधील महायुती सरकारमध्ये गृह खातं भाजपकडेच आहे. तसाच प्रयोग भाजपने बिहारमध्ये केला आहे. यामागे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह त्यांच्या जनता दलातील आमदार, खासदार, मंत्री, प्रमुख पदाधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचा रणनीती असल्याची चर्चा आहे.

नितीशकुमार यांनी गुरुवारी बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, गेल्या सरकारमधील सम्राट चौधरी व विजयकुमार सिन्हा हे दोन्ही उपमुख्यमंत्री कायम आहेत. नव्या मंत्र्यांचे खातेवाटप शुक्रवारी जाहीर करण्यात आले, त्यामध्ये सम्राट चौधरी यांच्याकडे गृह खातं देण्यात आले आहे.

गेल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी होती. अर्थ खात्याची जबाबदारी संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते विजेंद्रप्रसाद यादव यांच्याकडे देण्यात आली आहे. विजयकुमार सिन्हा यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी असेल.

CM Nitish Kumar
Municipal election petitions : निवडणूक आयोगाच्या पत्राविरुद्ध सहा याचिका; पाच सूचक बंधनकारकप्रकरण

याशिवाय, भाजपच्या (BJP) मंत्र्यांकडे नगरविकास, रस्तेनिर्माण, आरोग्य, कृषी ही महत्त्वाची खाती आहेत. तर, लोकजनशक्ती पक्षाच्या मंत्र्यांना सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी आणि ऊस उद्योग ही खाती देण्यात आली आहेत.

CM Nitish Kumar
Indian security information leak : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली; उत्तर प्रदेशमधील दोघांना अटक

शिंदे मुख्यमंत्री असतानाही भाजपकडे गृह खातं

महाराष्ट्रात महायुती सरकार आहे. महाविकास आघाडीच्या सरकार कोसळल्यानंतर भाजपने उपमुख्यमंत्री आणि गृहखातं स्वतःकडे घेत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना विराजमान केलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याने खाते वाटपात, गृह खातं आपल्याकडे घेतलं.

महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये भाजपची खेळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे महाराष्ट्राचं गृह खातं ठेवलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील फडणवीस यांच्याकडे गृह खातं होतं. मुख्यमत्र्यांच्याबरोबरीनं गृह खातं पॅरलल काम करतं. त्यामुळे या खात्याची उपयुक्तता लक्षात घेऊन, महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये भाजपने रणनीती आखत गृह खातं आपल्याकडे ठेवलं आहे.

भाजपची रणनीती नितीशकुमारांवर भारी?

भाजपने इथं दोन उपमुख्यमंत्री देत, गृह खात्याबरोबरच महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहे. बिहारमध्ये एनडीएमधील नितीशकुमार यांच्यासह त्यांच्या जेडीयूमधील आमदार, खासदार, मंत्री, प्रमुख पदाधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गृह खातं आपल्याकडे ठेवून, मोठी रणनीती खेळल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com