Valmik Karad Court News sarkarnama
महाराष्ट्र

Walmik Karad Gang Video Viral : जेलमध्ये असूनही वाल्मिक कराडची दहशत! तरुणाला हात जोडायला लावले, माफी...; 'तो' व्हिडिओ अंजली दमानियांनी दाखवला

Walmik Karad Police Beed Anjali Damania : तरुणाने वाल्मिक कराडच्या विरोधात पोस्ट केल्याने त्याला धमकावत माफी मागायला लावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Roshan More

Walmik Karad News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा बीडच्या तुरुंगात आहे. मात्र, तुरुंगात असूनही बाहेर त्याची दहशत कायम असल्याची स्थिती आहे. त्याचे समर्थक त्याच्या विरोधात करण्यात येणाऱ्या पोस्ट देखील सहन करत नाहीत. सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला वाल्मिक कराडच्या समर्थकांनी हात जोडून माफी मागायला लावली. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहेत की कराडचे समर्थक तरुणाला हात जोडून माफ मागायला सांगत अण्णाशिवाय पर्याय नाही. माझी चूक झाली. माफी मागतो, असे म्हणायला लावत आहेत. आणि तो तरुण देखील हात जोडून माफी मागतो आहे.

यावर अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, वाल्मिक कराड जेल मध्ये जाऊन ५ महिने झाले तरी त्यांच्या टोळ्यांचे दहशत आणि कारनामे संपत नाहीत. कोण अण्णा ? तो जेल मधला कैदी ? त्याच्या सगळ्या टोळ्यांना पोलिसी खाक्या दाखवून समज दिला पाहिजे. त्यांचे व्हिडिओ पोलिसांनी बनवून वेबसाइट वर टाकले पाहिजे. आम्ही दहशत करणार नाही, मारामाऱ्या करणार नाही, सज्जन माणसांसारखे वागू आणि आम्ही चुकीचे काही केले / गुंडपणा परत सुरू केला तर आम्हाला जेलमधे टाकले जाईल याचे भान आम्ही ठेवू.'

कराडला जेलमध्ये VIP ट्रिटमेंट

वाल्मिक कराड हा जेलमध्ये असला तरी त्यांना तेथे सर्व सुखसुविधा मिळत असल्याचा आरोप निलंबित पीएसआय रणजित कासले याने केला आहे. तसेच शिवराज बांगर यांनी देखील वाल्मिक कराडृ जेलमध्ये मोबाईल वापरतो. शासकीय मोबाईलवरून तो बाहेर संपर्क करतो. त्या फोनचा सीडीआर काढा.यात शासकीय अधिकारी देखील सहभागी आहे. फोनद्वारे तो बाहेर टोळी चालवतो, असा दावा देखील बांगर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT