Ajit Pawar Slams Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंपासून दूर जातायेत का? अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar Uddhav Thackeray :संविधान बदलाच्या आणि सीएएच्या बद्दल विरोधकांनी चुकीचा प्रचार केला. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत आम्हाला बसला. हे मी आधीच सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले.

Roshan More

Ajit Pawar News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 30 उमेदवार विजयी झाले. दलित आणि मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने त्यांना हे यश मिळाल्याचे विश्लेषण महायुतीचे नेते करत आहेत. विशेष करून मुस्लिम मतदार हे उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वक्फ बोर्डच्या प्रश्नावर ठाकरेंपासून मुस्लिम मतदार दूर जात आहे का? असे विचारले जात आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवारांनी आपली भूमिका मांडली.

'संविधान बदलाच्या आणि सीएएच्या बद्दल विरोधकांनी चुकीचा प्रचार केला. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत आम्हाला बसला. हे मी आधीच सांगितले आहे. निवडणूक झाल्यानंतर आम्ही विचार केला. चर्चा केल्या. सामान्य नागरिकांशी चर्चा केल्या. चर्चा केल्यानंतर माझ्या मनात आले ते मी सांगितले', असे म्हणत अजित पवारांनी मुस्लिम मतदार ठाकरेंपासून दूर जातो आहे का? यावर थेट बोलणे टाळले.

विकासावर बोलणारं

'आता जनसन्मान यात्रेद्वारे बाहेर निघालो आहे. तेव्हा मी एक ठरवलं आहे. आतापासून निवडणूक होण्यापर्यंत विकासावर बोलायचे. चंद्र सूर्य असेपर्यंत संविधानाला हात लावू देणार नाही. संविधान भवन उभारण्याचे काम आम्ही करत आहोत', असे अजित पवार म्हणाले.

बारामतीमधून जय पवार लढणार?

अजित पवार यांना आज (गुरुवारी) पत्रकारांनी जय पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी होत असल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, . पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातील कार्यकर्ते जी मागणी करतील ते आम्ही करायला तयार आहोत. जनतेचा, कार्यकर्त्यांचा तसा कल असेल त्याचा विचार पार्लमेंटरी बोर्डामध्ये केला जाईल,

'मातोश्री' बाहेर आंदोलन

वक्फ बोर्ड कायाद्यात केंद्रसरकारकडून बदल करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील विधेयक संसदेत मांडण्यात आले होते. मात्र, या विषयी संसदेत ठाकरे गटाची भूमिका काय? सरकारच्या या विधेयकाला ठाकरेंच्या 9 खासदारांनी विरोध केला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंचे निवासस्थान 'मातोश्री' मुस्लिम बांधवांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. तर, मातोश्री बाहेर आंदोलन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकं होते, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT