Assembly Election 2024 : ठरलं तर! शरद पवारांचे डावपेच, काँग्रेसची तरुण फळी आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा...

MahaVikas Aaghadi Sharad Pawar Congress Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. शरद पवार यांची मुत्सद्देगिरी, डावपेच यासह विविध भागांमध्ये असलेली काँग्रेसच्या तरुण नेत्यांची फळी आणि उद्धव ठाकरे यांचा चेहरा, या बळावर महायुतीला घाम फोडण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचा दौरा केला. त्यावेळी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा यशस्वी झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील, हे निश्चित झाल्याचे मानले जात आहे. दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळीच महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार, याचा अंदाज आला होता.

उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला आहे. भाजपच्या दिल्लीतीन नेत्यांशी दोन हात करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुत्सद्देगिरी आणि डावपेच, उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती आणि त्यांची आक्रमकता, काँग्रेसच्या तरुण नेत्यांची फळी याच्या जोरावर महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याचा महाविकास आघाडीचा विचार असून, त्यादृष्टीने हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Haribhau Bagade : राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे यांचा पहिला स्वातंत्र्यदिन; पाहा खास फोटो...

दिल्ली दौऱ्यात काँग्रेससह इंडिया आघाडीतील विविध पक्षांतील दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दिल्लीत या घडामोडी सुरू असताना महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा होणे, हे महायुतीसाठी जड जाणारी बाब आहे.

विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची क्षमता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांनी लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वीही दाखवली आहे. त्यामुळे महायुतीला टक्कर द्यायची असेल तर उद्धव ठाकरे यांच्याच चेहरा समोर असणे गरजेचे आहे, याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना झाली होती. महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हला हिंदुत्वानेच उत्तर देणे ठाकरे यांनाच शक्य होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे नाव ब्रँड आहे, त्याला वलय आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. माझ्या उद्धव आ्रणि आदित्यला सांभाळा, असे आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केले होते. बाळासाहेबांच्या या आवाहनाने त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांचे मन हेलावून गेले होते.

गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडी पाहिल्या तर मात्र चित्र वेगळे दिसून येत आहे. शिवसेना -भाजपची युती तुटल्यानंतर 2019 मध्ये महायुतीचे सरकार आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत गेल्यामुळेअडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळाली होती.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Jayant Patil : "तुम्ही म्हणा चंद्र पाहिजे, ते म्हणतील 2 महिन्यात..."; महायुती सरकारवर जयंत पाटलांची टोलेबाजी

कोरोनाच्या काळात भाजपशासित अन्य राज्यांत मृतदेहांची विटंबना होत असताना महाराष्ट्रात मात्र तुलनेने बरी परिस्थिती होती. उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. कुटुंबप्रमुख अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. हे सर्व झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले होते. उद्धव ठाकरे यांना राज्यात सहानुभूती का आहे, याचे उत्तर येथेच मिळून जाते. उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर करून निवडणूक लढण्यात आपला फायदाच आहे, हे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कळत नाही, असे म्हणता येणार नाही.

मुत्सद्देगिरी आणि राजकीय डावपेच आखून ते तडीस नेण्यात शरद पवार यांचा हात धरू शकेल, असा नेता सध्या तरी महाराष्ट्रात अन्य कुणी दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यात ती क्षमता नक्कीच दिसून येत होती, मात्र त्यांचा आलेख जितक्या वेगाने वर चढला तितक्याच वेगाने तो खाली आल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.

दुसरीकडे, या वयातही शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवलेली जिद्द लोकांना भावली आहे. त्यांचे 10 पैकी 8 उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीतही या यशाची पुनरावृत्ती करण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. शरद पवार यांची मुत्सद्देगिरी, डावपेच; विविध भागांमध्ये असलेली काँग्रेसच्या तरुण नेत्यांची फळी आणि उद्धव ठाकरे यांचा चेहरा, या बळावर महायुतीला घाम फोडण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com