Sanjay Raut latest allegations against Shinde group Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'शिंदे गट आणि 'त्या' 6 खासदारांमध्ये मध्यरात्री काय डील झाली?' संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Sanjay Raut latest statement : शिंदे गट आणि 6 खासदारांमध्ये झालेल्या कथित मध्यरात्रीच्या डीलबाबत संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. या राजकीय घडामोडीमागील संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

Sanjay Raut on rebel MPs and political deal: राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांनी वातावरण तापले आहे. पुढील काही दिवसांत ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार शिंदे सेनेत दाखल होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संभाव्य घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसू शकतो, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर खासदारांच्या संभाव्य पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी दावा केला की, पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांशी काही आर्थिक आणि राजकीय व्यवहार झाले आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असून इतरांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांच्याकडे आहे. हा संपूर्ण व्यवहार रात्री उशिरापर्यंत झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

राऊत यांनी राज्य सरकार आणि गृह विभागावरही निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणासाठी यंत्रणा वापरली जात असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिस दलाचा वापर सामान्य नागरिकांपेक्षा राजकीय हितसंबंध जपण्यासाठी होत असल्याचे त्यांनी म्हटले.

फुटीर आमदार आणि खासदारांवर टीका करताना राऊत म्हणाले की, जर जनतेचा पाठिंबा असल्याचा विश्वास असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. पक्षाच्या बळावर निवडून आलेल्या लोकांनी निष्ठा सोडून वेगळा मार्ग स्वीकारणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षाने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर विश्वास दाखवून संधी दिली होती, मात्र कठीण काळात त्यांनी पक्षासोबत उभे राहणे अपेक्षित होते, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. तसेच शिंदे गटाच्या संपर्कात ठाकरे गटातील 50 नगरसेवक असल्याचा दावा फेटाळून लावत तो केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT