Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरेंचा हात सोडताच ओमराजेंना मोठा धक्का! हजारो फॉलोअर्सनी केलं अनफॉलो

Thousands unfollow Omraje Nimbalkar after political move: ओमराज निंबाळकर हे ठाकरे गटापासून दूर गेल्याच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हजारो फॉलोअर्सनी त्यांना अनफॉलो केले.
Omraje Nimbalkar followers unfollow controversy
Omraje Nimbalkar followers unfollow controversySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Split: शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे ६ खासदार उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती.

मात्र प्रत्यक्ष बैठकीला केवळ चार खासदार उपस्थित राहिले होते, तर उर्वरित खासदार ऑनलाईन सहभागी झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा वेगाने सुरू झाली होती.

या बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांतच अनेक खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बंडखोरीनंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थक संतप्त झाले असून, त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात सोशल मीडियासह विविध माध्यमांतून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ‘गद्दार’ अशी टीका करत निषेध नोंदवण्यात आला.

Omraje Nimbalkar followers unfollow controversy
MLA Anant Singh Convoy Accident: आमदार थोडक्यात बचावले! विवाह समारंभाहून परतताना ताफ्यातील पाच गाड्यांची धडक

सोशल मीडियावरील आकडेवारीतही या नाराजीचे प्रतिबिंब दिसून येत आहे. डिजिटल माध्यमांवरील लोकप्रियता ही आजच्या काळात नेत्यांच्या जनाधाराचे महत्त्वाचे मोजमाप मानली जाते. अशातच, ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्याच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया अकाऊटवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

गेल्या २४ तासांत त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून जवळपास २० हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. तसेच फेसबुकवरही सुमारे ६ हजार लोकांनी त्यांना अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तरुण वर्गाकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Omraje Nimbalkar followers unfollow controversy
Lohagad Fort Accident: जयपूरमध्ये शाही विवाह, दोन विमानांचे बुकिंग; लग्नाच्या 10 दिवस आधीच लोहगडावर काळाचा घाला

धाराशिवमध्ये सोशल मीडियावर सक्रिय आणि लोकप्रिय असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला या घडामोडींमुळे फटका बसल्याची चर्चा सुरू आहे. आता पुढील काळात ते या परिस्थितीचा सामना कसा करतात आणि आपली राजकीय व सामाजिक प्रतिमा पुन्हा मजबूत करण्यात कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com