Maharashtra News : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. (Prakash Ambedkar on Fadanvis) अबू आझमी यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थितीत केल्यावर भाजपच्या आमदारांनी आक्रमक होत त्यांना गद्दार म्हटले.
या गदारोळ आणि औरंगजेबाच्या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर देतांना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुले वाहिल्याचा उल्लेख देखील केला. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) प्रतिक्रिया व्यक्त करत फडणवीसांवर पलटवार केला आहे.
आंबेडकरांनी या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करत फडणवीसांना काही प्रश्न विचारले आहेत. (Vanchit Bahujan Aghadi) आंबेडकर म्हणाले, काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहने आणि पोस्ट ठेवणे यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं ते गोलमाल उत्तर आहे.
खऱ्या अर्थाने त्यांनी उत्तर दिले पाहिजे की देशात कुणाच्याही मजारीवर, कबरीवर जाण्यास बंदी आहे का? याचा खुलासा त्यांनी करावा. कुणाचं काय मत आहे हा वेगळा भाग आहे पण, कायद्याने बंदी असेल तर ते सांगावं. आणि कायद्याने बंदी नसेल तर त्याचाही त्यांनी खुलासा करावा. आंबेडकरांच्या या भूमिकेनंतर आता फडणवीसांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.