Ashok Chavan On Nitin Desai : देसाईंचा एन.डी. स्टुडिओ सरकारने अधिग्रहित करावा..

Congress News : नितीन देसाई यांनी आपल्या कर्तृत्वातून, परिश्रमातून, तपस्येने चित्रसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले.
Ashok Chavan On Nitin Desai News
Ashok Chavan On Nitin Desai NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : कला दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या दुर्दैवा मृत्यूनंतर त्यांच्या एन.डी. स्टुडिओचे काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. परंतु या स्टुडिओचा लिलाव न होऊ देता राज्य सरकारने तो अधिग्रहित करावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केली. (Ashok Chavan On Nitin Desai) यावर उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

Ashok Chavan On Nitin Desai News
Pravin Darekar On Nitin Desai: देसाई यांच्या आत्महत्येची चौकशी करा ; दोषींना जेलमध्ये टाका..

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सभागृहात नितीन देसाई यांच्या मृत्यूचा विषय मांडला. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओचा लिलाव न होऊ देता राज्य सरकारने तो अधिग्रहित करावा; ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. (Congress) नितीन देसाई यांनी आपल्या कर्तृत्वातून, परिश्रमातून, तपस्येने चित्रसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले. सर्वांच्याच मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे.

मृत्यूपूर्वी त्यांनी काही ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये त्यांच्यावरील कर्ज आणि त्या कर्जाच्या वसुलीसाठी जाचक पद्धतीने काही लोक त्यांच्या मागे लागल्याचा उल्लेख असल्याचे ऐकिवात आहे. (Devendra Fadanvis) याबाबतची सत्यता गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावी, अशी विनंती मी विधानसभाध्यक्षांच्या माध्यमातून करतो.

या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येची सर्व बाजुंनी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. एन.डी. स्टुडिओवर कर्ज असल्याने तो अधिग्रहित करण्याबाबत कायदेशीर पैलू तपासले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com